अर्थ मंत्रालय
संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यापार मंत्री थानी बिन अल झेयुदी यांनी घेतली केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांची भेट
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2021 6:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021
संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यापार मंत्री थानी बिन अल झेयुदी यांनी आज केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेतली. भारत व संयुक्त अरब अमिरातीमधील दृढ आर्थिक व वाणिज्य संबधांविषयी तसेच दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधाना कारणीभूत असणारी सर्वंकष धोरणात्मक भागीदारी याविषयी उभय पक्षांनी चर्चा केली.

सध्याचे व्यापार व गुंतवणूक संबध वाढीस लागावे तसेच द्विपक्षीय व्यापारसंबधात सुधारणा व्हावी या उद्देशाने थानी बिन अल झेयुदी व संयुक्त अरब अमिरातीचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ नवी दिल्लीला आले आहे. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) संदर्भातील वाटाघाटींची पहिली फेरी सुरू आहे.
कोविड महामारीतही दोन्ही देशांमधील नियमित द्विपक्षीय भेटी या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबधांचे द्योतक आहेत.
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1757342)
आगंतुक पटल : 195