वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते एन आय टी आय ई संस्थेमधील मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनातील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन
औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रात खूप मोठी क्षमता आहे, तुम्ही जे काम करता आहात त्याच्या माध्यमातून तुम्ही या देशाच्या भवितव्यात मोठे परिवर्तन घडवू शकता : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
23 SEP 2021 4:04PM by PIB Mumbai
मुंबई, 23 सप्टेंबर 2021
जागतिकीकरण झालेल्या विश्वात परस्परांवरील अवलंबित्वाचे प्रमाण मोठे असल्याने- पॅकेजिंग, संशोधन, सामग्रीची वाहतूक करण्यासाठी सर्वोत्तम उपाय, प्रभावी साठवणूक आणि गोदाम आणि अशाच इतर प्रकारांमध्ये मूल्यवर्धनाची गरज निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये खूप मोठी क्षमता आहे आणि राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेत तुम्ही ज्या प्रकारे काम करत आहात त्याद्वारे या देशाचे भवितव्य बदलू शकता असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग आणि ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल म्हणाले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग आणि ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत एन आय टी आय ई अर्थात राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेमधील मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनातील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.
सध्याच्या जगात, जागतिक पुरवठा साखळी आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठे मूल्य प्राप्त करून देत असताना, अनेक उत्पादनांना लागणारा कच्चा माल आणि सुटे भाग अनेक विविध देशांतून आयात झालेले असताना, एकमेकांवरील अवलंबित्व पॅकेजिंग, वाहतूकविषयक संशोधन, माल गोदामे आणि इतर अनेक महत्त्वाच्या घटकांतील मूल्यवर्धनाची आवश्यकता अधोरेखित करते असे गोयल यांनी सांगितले .
आज उद्घाटन केलेल्या गुणवत्ता केंद्राचा लॉजिस्टिक्स क्षेत्र किफायतशीर बनवण्यासाठी, हे क्षेत्र स्पर्धात्मक बनवण्यासाठी,नवे रोजगार निर्माण करण्यासाठी, जास्त निर्यात करण्यासाठी, जागतिक बाजारपेठेच्या जास्त संपर्कात राहण्यासाठी, बाजारपेठेची व्याप्ती वाढवण्यासाठी, भारतातील आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी उपयोग होईल, अशी मला आशा आहे असे ते म्हणाले .
या केंद्रामध्ये उद्योग आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थाच्या सहकार्याने नवोन्मेषकारक संशोधनातून मिळणारे उपाय शोधण्यासाठी संशोधन प्रकल्प राबवले जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
जे लोक प्रगती आणि समृद्धीच्या फळांपासून वंचित आहेत त्या लाखो लोकांसाठी आपण एकत्रितपणे त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवू शकतो आणि आशेचा किरण दाखवू शकतो. प्रत्येक भारतीयामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला जे काही मिळू शकते त्यापेक्षा अधिक काही देण्याची आपली तयारी असली पाहिजे. असे करून आपण एकत्रितपणे आपल्या देशाचे भवितव्य घडवू शकतो असे ते म्हणाले .
इतर क्षेत्रांशी संबंध निर्माण होतो. पिझ्झा योग्य वेळेत पोहोचवण्याची प्रक्रिया विनासायास करण्यासाठी आणि उपाहारगृहाची रचना आणि परिचालन यांसारख्या बाबी निश्चित करण्यासाठी औद्योगिक अभियांत्रिकीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो हे लक्षात घेऊन सार्वजनिक सेवांचे वितरण करण्यासाठी अशाच प्रकारे अतिशय बारकाव्याने नियोजन करणे आवश्यकआहे असे गोयल म्हणाले.
केवळ कारखाने उभारणे नव्हे तर सामग्रीची वाहतूक, पॅकेजिंग, माल पाठवणे आणि प्रत्यक्ष त्या कारखान्याची रचना या सर्वच बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्याची जबाबदारी तुमच्या खांदयावर आहे असे त्यांनी सांगितले . ज्यावेळी मी राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेने केलेले चांगले कार्य पाहिले त्यावेळी सरकारकडून काही प्रमाणात पाठबळ मिळाले तर त्याचा उपयोग सार्वजनिक, खाजगी आणि शैक्षणिक क्षेत्रात हितसंबंधी आणि भागीदार म्हणून एकत्र काम करताना होऊ शकेल, असे माझ्या लक्षात आले असे ते म्हणाले.
खासदार गोपाल शेट्टी , एन आय टी आय ई चे संचालक प्रा. मनोज के तिवारी , संचालक मंडळ सदस्य, अधिष्ठाता, संचालक आणि रजिस्ट्रार यांनी नामनिर्देशित केलेले विद्याशाखेतले प्रतिनिधी आणि अन्य प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते .
मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनातील उत्कृष्टता केंद्र
जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकता आणि आर्थिक संकटांनी निर्माण केलेल्या आव्हानांमुळे पुरवठा साखळीचे व्यवस्थापन अधिकाधिक जातील होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनातील अत्याधुनिक संशोधन, ज्ञानवर्धन आणि क्षमता बांधणीसाठी हे केंद्र उपयोजित संशोधन आणि विकासविषयक उपक्रमांच्या माध्यमातून योगदान देईल.
या क्षेत्रातील आधुनिक ज्ञान वितरीत करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, यांत्रिक शिक्षण साधने आणि डिजिटल जुळे आणि नियंत्रण मनोरे यांच्या माध्यमातून गुंतागुंतीच्या मालवाहतूक व्यवहारांचे परीक्षण आणि विश्लेषण अधिक सशक्त करण्यासाठी डिजिटलीकरण, विश्लेषकता तसेच आयओटी कार्य आणि निर्णय पाठींबा प्रणाली यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र एक प्रेरक शक्ती म्हणून काम करेल.
औद्योगिक जगत आणि राष्ट्रीय तसच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यातून हे केंद्र, अभिनव संशोधन संशोधनविषयक कल्पना शोधण्यासाठी संशोधन प्रकल्प राबवणार आहे. यांमध्ये शाश्वतता आणि हरित पुरवठा साखळीसह मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले आहे.
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था ( एनआयटीआयई)
ही व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था आहे. भारत सरकारने 1963 मध्ये युएनडीपी अर्थात संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्या सहाय्याने, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे या संस्थेची स्थापना केली. ही संस्था केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे संचालित आहे. 2021 च्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात,भारतातल्या व्यवस्थापन शिक्षण संस्थामध्ये एनआयटीआयईने 12 वे स्थान प्राप्त केले आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे या कार्यक्रमातील भाषण आपण येथे ऐकू शकता
Jaydevi PS/ SC / NC/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757264)
Visitor Counter : 394