संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांचा मुंबई दौरा

Posted On: 14 SEP 2021 2:14PM by PIB Mumbai

मुंबई, 14 सप्टेंबर 2021

  • लष्करप्रमुख दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर
  • लष्करप्रमुखांनी पश्चिमी नौदल कमांड आणि आयएनएस तेग युद्धनौकेला भेट दिली
  • लष्करप्रमुखांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली, माजी सैनिकांच्या  कल्याणासंबंधी मुद्यांवर केली चर्चा
  • लष्करप्रमुखांनी 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा भाग म्हणून लष्करासाठी अत्याधुनिक उपकरणांची निर्मिती आणि पुरवठा करण्याबाबत  प्रमुख उद्योगांच्या प्रतिनिधींची  भेट घेतली

लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी 12 सप्टेंबर 2021 रोजी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले. आर्मी वाइफ्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्ष वीणा नरवणे त्यांच्यासोबत होत्या. लेफ्टनंट जनरल एसके पराशर, एव्हीएसएम, व्हीएसएम, जीओसी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र आणि आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या विभागीय अध्यक्ष ममता पराशर यांनी त्यांचे मुंबईत स्वागत केले.

लष्करप्रमुखांनी 13 सप्टेंबर रोजी पश्चिमी नौदल कमांडला भेट दिली. यावेळी त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. त्यांनी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, पश्चिमी नौदल कमांड, व्हाइस एडमिरल आर हरी कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांच्याशी संवाद साधला.

त्यांनी दोन्ही सेनादलांदरम्यानचे सहकार्य, कार्य सज्जता  आणि प्रशासकीय मुद्यांवर चर्चा केली.

लष्करप्रमुखांनी शीख लाइट इन्फंट्री रेजिमेंटशी संलग्न स्टील्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेट आयएनएस तेगलाही भेट दिली, यावेळी त्यांना या  युद्धनौकेच्या क्षमतेबद्दल माहिती देण्यात आली.

त्यानंतर लष्करप्रमुखांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील माजी सैनिकांच्या कल्याण आणि पुनर्वसनाशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देत  त्यांनी संरक्षण दलांसाठी अत्याधुनिक उपकरणांच्या निर्मिती आणि पुरवठ्यासाठी संरक्षण क्षेत्रात सहभाग असलेल्या प्रमुख उद्योगांच्या  प्रतिनिधींशीही संवाद साधला.

 

M.Iyengar/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754742) Visitor Counter : 174


Read this release in: English