अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते महाराष्ट्रामधील 3 अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे आभासी उद्‌घाटन

Posted On: 09 SEP 2021 10:08PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2021

 

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री पशुपती कुमार पारस यांनी आज नवी दिल्लीतून महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणा येथील  6 अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे आभासी माध्यमातून उद्‌घाटन केले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनीही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

आज उद्‌घाटन झालेले प्रकल्प सुमारे रु. 76.76 कोटी रुपये खर्चाचे असून मंत्रालयाने या प्रकल्पांसाठी 24.19 कोटी रुपये अनुदान दिले आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे 2500 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळेल आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 6800 शेतकऱ्यांना फायदा होईल.

आज उद्‌घाटन झालेल्या अन्नप्रक्रिया प्रकल्पांमध्ये  महाराष्ट्रातील नाशिकमधील  मेसर्स सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी आणि मेसर्स अश्वमेध अभियंते आणि सल्लागार तसेच  पुण्यातील मेसर्स मायक्रोटेक फूड टेस्टिंग लॅबोरेटरी या तीन प्रकल्पांचा समावेश आहे.

Project Name

District, State

Scheme

Project Cost
(in Rs. crores)

Grant from the Ministry
(in Rs. crores)

M/s Sahyadri Farmers Producers Company

Nasik, Maharashtra

APC Scheme

33.27

8.66

M/s Ashwamedh Engineers and Consultant

Nasik, Maharashtra

FTL

4.60

2.17

M/s Microtech Food Testing Laboratory

Pune, Maharashtra

FTL

1.54

0.77

M/s Numix Industries

Udham Singh Nagar, Uttarakhand

CEFPPC

10.48

3.95

M/s Shell Mount Fresh

Sonipat, Haryana

Cold Chain Scheme

24.08

8.64

Bakery Pilot Plant

Sonipat, Haryana (NIFTEM)

BFL

2.79

----

याशिवाय, मेसर्स सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने स्थापन केलेल्या कृषी प्रक्रिया क्लस्टरमध्ये मंत्रालयाने 5 अन्न प्रक्रिया युनिट मंजूर केले असून एकूण  49.89 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून यात 20.21 कोटी रुपये अनुदानाचा समावेश आहे.  आणि आतापर्यंत 14.57 कोटी रुपये या युनिट्सना वितरीत करण्यात आले आहे. या पाच युनिट्समुळे सुमारे 8375 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या  रोजगार प्राप्त होणार असून आसपासच्या परिसरातील सुमारे 12500 शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.

श्री. पशुपती कुमार पारस म्हणाले म्हणाले की, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणातील हे प्रकल्प अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासाला चालना देतील आणि या प्रकल्पांमुळे अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल.

 

 

 

 

 

 

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1753683) Visitor Counter : 596


Read this release in: English