शिक्षण मंत्रालय
आयआयटी मुंबईच्या 1994 च्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने ग्रोथ (GROWTH) - इंडिया टेलिस्कोप'च्या कार्यान्वयनासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचा भारतीय खगोल भौतिकशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार
Posted On:
08 SEP 2021 6:38PM by PIB Mumbai
मुंबई, 8 सप्टेंबर 2021
(GROWTH) ग्रोथ - इंडिया टेलिस्कोपचे कार्यान्वयन आणि वैज्ञानिक वापरासाठी सुरु असलेले सहकार्य वाढवण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने 30 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय खगोल भौतिकशास्त्र संस्थेशी (आयआयए) पाच वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
विज्ञान तंत्रज्ञान विभाग -विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने आणि भारत - अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाच्या समर्थित प्रकल्पाअंतर्गत आयआयए आणि आयआयटी मुंबई यांनी संयुक्तपणे (GROWTH) ग्रोथ-इंडिया टेलिस्कोप स्थापित केला आणि 2018 मध्ये कार्यान्वित करण्यात आला. या सहकार्या अंतर्गत, उभय संस्थांनी या प्रकल्पाचे कार्यान्वयन संयुक्तपणे चालू ठेवण्याबद्दल सहमती दर्शवली. या प्रकल्पा अंतर्गत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून दूरस्थपणे या रोबोटिक दुर्बिणीचा वापर सुरु राहील आणि निरीक्षणे आणि माहिती प्रक्रियेसाठी साधने वापरली जातील आणि विकसित करण्यात येतील. ग्रोथ - इंडिया टेलिस्कोपचे संचालन 1994 च्या आयआयटी मुंबईच्या 1994 च्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या उदार योगदानाद्वारे समर्थित आहे.
आयआयए आणि आयआयटी बॉम्बे यांच्या संयुक्त भागीदारीने ग्रोथ - इंडिया टेलिस्कोप लडाखमध्ये स्थापित 0.7 मीटर रुंद क्षेत्रीय दुर्बीण आहे. गुरुत्वाकर्षण लहरीच्या घटनांमधून उत्सर्जन, सुपरनोवा आणि पृथ्वीजवळील लघुग्रह यांसारख्या गुणधर्म बदलणाऱ्या वैश्विक स्त्रोतांचा सतत अभ्यास करणे हे आंतरविद्याशाखीय प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही देशातील पहिली पूर्णपणे रोबोटिक ऑप्टिकल दुर्बिण आहे आणि युरोप आणि अमेरिके बाहेर असलेल्या अशाप्रकारच्या काही मोजक्या सुविधांपैकी एक आहे.
या भागीदारीबद्दल बोलताना आयआयटी मुंबईचे संचालक प्रा.सुभाषिश चौधरी म्हणाले,''खगोलशास्त्रीय संशोधनात अग्रेसर होणे हे आयआयटी मुंबईचे ध्येय आहे. आणि आयआयए सोबतची ही प्रतिष्ठित भागीदारी आम्हाला आमच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने एक पाऊल जवळ आणते''.
आयआयए चे संचालक प्रा.अन्नपूर्णी सुब्रमण्यम म्हणाल्या की, ''आयएनएच्या हॅन्ले येथील भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळेत स्थापित ग्रोथ - इंडिया टेलिस्कोप, ही एक अशी सुविधा आहे जी ट्रान्झियन्ट स्रोतांच्या अभ्यासाला समर्पित आहे.आयआयटी मुंबईच्या तरुण आणि उत्साही चमूसह जगातील सर्वोत्तम असलेल्या दुर्बीण सेवेपैकी एक असेलली दुर्बिणी सुविधा चालवण्याच्या बाबतीत कौशल्य आणि अनुभवाची संपत्ती असणारा आयआयए चा समुह यांच्यात एक उत्तम सहकार्य आहे ज्यांनी गेल्या तीन वर्षात आकर्षक निष्कर्ष सादर केले आहेत''.
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1753269)
Visitor Counter : 193