कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसदेच्या कृषी विषयक स्थायी समितीने 06.09.2021 रोजी गोव्याच्या आयसीएआर-सीसीएआरआयला भेट दिली

Posted On: 08 SEP 2021 4:48PM by PIB Mumbai

गोवा, 8 सप्‍टेंबर 2021 

 

खासदार पर्वतगौडा गड्डीगौदर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ खासदारांचे पथक आणि लोकसभा सचिवालयातील अधिकारी आणि आयसीएआर (भारतीय कृषी संशोधन परिषद) मुख्यालयाचे  अतिरिक्त महासंचालक यांनी 6.09.2021 रोजी कृषी, पशु संवर्धन आणि मत्स्यउद्योग  संशोधन आणि विकास अभ्यासासाठी गोव्याला भेट दिली.  या सर्वांनी आयसीएआर-सीसीएआरआय (सेंट्रल कोस्टल ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट), गोवा येथील नारळ आधारित पीक पद्धती, कोकोनट -हेलिकोनिया, मंगो जर्मप्लाझम या प्रायोगिक क्षेत्रांना भेट दिली. समितीने संकुलात आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या स्टॉल्सला देखील भेट दिली आणि संस्थेच्या विविध तंत्रज्ञानाची आणि उत्तर गोव्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या विस्तार उपक्रमांची माहिती जाणून घेतली. या सदस्यांनी भेटीदरम्यान तिथले वैज्ञानिक आणि काही प्रगतिशील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

आयसीएआर-सीसीएआरआयचे संचालक डॉ.परवीन कुमार यांनी संस्थेबद्दल आणि सुधारित वाण आणि इतर तंत्रज्ञानातली  त्यांची कामगिरी  तसेच शाश्वत उपजीविकेवर त्याचा प्रभाव याबाबत माहिती दिली. या सदस्यांनी संस्थेमध्ये केल्या जात असलेल्या कार्याचे कौतुक केले आणि संशोधनाबाबत सूचना केल्या. त्यांनी गोव्याच्या मानकुराद प्रकारच्या आंब्यांचे जीआय टॅगिंग करण्याबाबत सूचना केली. आंतरपिक पद्धतीद्वारे नारळाच्या आर्थिक परताव्याला प्रोत्साहन देण्याच्या उपायांबाबत त्यांनी वैज्ञानिकांशी संवाद साधला. या सदस्यांनी नवीन ड्रोन आधारित तंत्राद्वारे नारळाची सुलभ कापणी आणि फवारणी या बाबत सूचना केली.  सुधारित वाणांद्वारे गोवा राज्याची भात उत्पादकता वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. किनारपट्टी भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी वैज्ञानिकांच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

* * *

Jaydevi PS/S.KaneD.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1753185) Visitor Counter : 173


Read this release in: English