महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालय , मुंबई फोटो रिलीज


केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन ईराणी यांनी मुंबईतील धारावी एकात्मिक बाल विकास सेवा केंद्राला दिली भेट

Posted On: 06 SEP 2021 1:32PM by PIB Mumbai

मुंबई दि .6  सप्टेंबर 2021

धारावी येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्राला केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती झुबीन ईराणी यांनी आज भेट दिली

 

केंद्रीय मंत्र्यांनी या सेवा केंद्राच्या काही लाभार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्या निवासस्थानांना देखील भेट दिली.केंद्रसरकारच्यावतीने साजऱ्या होत असलेल्या“पोषणअभियाना”अंतर्गत“पोषणमास” उपक्रमासाठी हाती घेतलेल्या विविध लक्ष्यित कार्यक्रमांचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री ईराणी मुंबईत आल्या आहेत.

गंभीर स्वरूपातील कुपोषित मुले, गर्भवती माता तसेच स्तनदा मातांना ईराणी यांनी याप्रसंगी फळे आणि पोषणआहार किट यांचे वाटप केले.

 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर वॉर्डमध्ये आज हा कार्यक्रम आयोजित करण्यातआला

केंद्रीय मंत्र्यांनी डिजिटल बाहुला-बाहुली फळयाचे केले उद्घाटन

या प्रसंगी, केंद्रीय मंत्री ईराणी यांनी यावेळी आयसीडीएस परिसरातील, डिजिटल बाहुला-बाहुली फळयाचे देखील उद्घाटन केले. हा फळा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाअंतर्गत गोळा होणाऱ्या जन्मसंबंधी आकडेवारीचे अद्यतन, परीक्षण आणि प्रदर्शन यांचे सादरीकरण करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. या योजनेबद्दलची माहिती आणि शैक्षणिक साहित्य यांच्याबाबत देखील या फळ्यावरून माहिती पुरवली जाते म्हणून हा फळा सल्ला तसेच ज्ञान यांचे माध्यम म्हणून भूमिका बजावत आहे. हा फळा म्हणजे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाअंतर्गत केलेले अभिनव डिजिटल संशोधन आहे.

पोषण अभियानाबाबत

पोषण अभियान हा लहान मुले, पौगंडावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र  सरकारने हाती घेतलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.  आरोग्य, स्वास्थ्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या तसेच कुपोषण दूर करणाऱ्या पद्धती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करून पोषण सामग्रीची उपलब्धता, त्याचे वितरण, त्यासाठी योग्य लाभार्थ्यांशी संपर्क  आणि त्यातून साधलेले परिणाम अधिक तीव्र करण्यासाठीचा एकात्मिक पोषण समर्थन कार्यक्रम म्हणून 2021-2022 च्या अर्थसंकल्पात मिशन पोषण 2.0 (सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0) ची घोषणा करण्यात आली आहे.

या अभियानाबाबत समाज जागृती तसेच जनतेचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी दर वर्षीचा सप्टेंबर महिना “पोषण मास” म्हणून देशभर साजरा केला जात आहे.

***

Jaydevi PS/S.Chitnis/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1752526) Visitor Counter : 293


Read this release in: English , Hindi