संरक्षण मंत्रालय
आयएनएस तबरचा मोरोक्कन नौदलाबरोबर सराव
प्रविष्टि तिथि:
31 AUG 2021 5:55PM by PIB Mumbai
मुंबई, 31 ऑगस्ट 2021
परदेशातील तैनातीचा भाग म्हणून आयएनएस तबर 25 आणि 26 ऑगस्ट 21 रोजी मोरोक्कोच्या कॅसाब्लांका येथे थांबली होती (पोर्ट कॉल ).
26 ऑगस्ट 21 रोजी बंदर सोडल्यानंतर, जहाजाने कॅसाब्लांका बंदराजवळ रॉयल मोरक्कन नौदलाचे जहाज 'लेफ्टनंट कर्नल अर्रहमान' बरोबर सागरी भागीदारी सरावात भाग घेतला. या सरावादरम्यान संपर्क कौशल्य, समुद्री प्रक्रियेत भरणा प्रक्रिया आणि नौदल डावपेच सारखे उपक्रम हाती घेण्यात आले होते. परस्परांना निरोप देण्यासाठी दोन जहाजांदरम्यान पारंपारिक 'स्टीम पास्ट' ने सरावाची सांगता झाली.




M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1750792)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English