संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वेलिंग्टन डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजला संबोधित
भारत संरक्षण क्षेत्रातील गतिमानतेच्या जागतिक बदलांना सामोरे जाण्यास सज्ज: संरक्षणमंत्री
Posted On:
29 AUG 2021 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 28-29 ऑगस्ट 2021 रोजी वेलिंग्टन वेलिंग्टन डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजला (DSSC) भेट दिली. संरक्षणमंत्र्यांना यावेळी डीएएससीमध्ये दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक लष्करी प्रशिक्षणाविषयी तपशीलवार माहिती देण्यात आली. त्यांनी भारतातील तसेच इतर देशातील तरुण अधिकार्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची आणि राष्ट्रीय सुरक्षेत उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक लष्करी शिक्षणातील परिवर्तनाची प्रशंसा केली.
77 व्या अभ्यासक्रमाच्या छात्रांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, की सरकारने केलेल्या सुधारणांमुळे भारत जगातील बदलत्या संरक्षण गतिमानतेला सामोरे जाण्यास सज्ज आहे, सशस्त्र दलांनी प्रत्येक वेळी पूर्णपणे सुसज्ज आणि तयार असणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले, "आम्ही आमचे सैन्य बलशाली करत राहू आणि बदलत्या जागतिक वातावरणामुळे उद्भवणाऱ्या सर्व सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे आहोत याची खात्री करू."
सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाबाबत संरक्षणमंत्री म्हणाले, "राफेलचा समावेश केल्याने नेक्स्ट जनरेशन एअरक्राफ्टची दीर्घ प्रतीक्षा संपली". ते पुढे म्हणाले, की अर्जुन मेन बॅटल टँक, लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर, आर्मर्ड फाइटिंग वाहनांसाठी पर्यायी मापन यंत्रणा विकसित करणे आणि हवाई संरक्षण बंदुकांचे आधुनिकीकरण करणे ही आमच्या सैन्याच्या आधुनिकीकरण करण्यासाठी उचललेली इतर पावले आहेत.
अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे सांगून संरक्षणमंत्री म्हणाले, की बदलत्या समीकरणांनी प्रत्येक देशाला आपल्या रणनीतीवर विचार करण्यास भाग पाडले आहे. या पार्श्वभूमीवर क्वाड(QUAD) हा भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान यांचा एकत्रित समूह तयार करण्यात आला आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
S.Thakur/S.Patgoankar/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750278)
Visitor Counter : 238