संरक्षण मंत्रालय

वायएआय वरिष्ठ गट 2021 (इन-एमडीएल चषक) स्पर्धेचे 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान मुंबईत आयोजन

Posted On: 26 AUG 2021 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2021

भारतीय नौदल – माझगाव गोदी मर्यादीत (इन-एमडीएल) चषक 2021 स्पर्धेचे आयोजन इंडीयन नेवल वॉटरशिप ट्रेनिंग सेंटर (आयएनडब्लूटीसी), मुंबईने यॉटींग असोसिएशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली सर्व वरिष्ठ ऑलिम्पिक दर्जाच्या वायएआय वरिष्ठांसाठी केले आहे. नौकानयनाची ही स्पर्धा, 1 ते 6 सप्टेंबर 2021 या कालावधीत घेतली जाणार आहे. चीनमधे 2022 मधे होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी ही निवड चाचणीही ठरणार आहे. मुंबई बेटाजवळ संक रॉक लाईटहाऊस ते प्रॉन्ग्ज लाईटहाऊस दरम्यान ही स्पर्धा होईल.

रिअर अॅडमिरल अतुल आनंद, फ्लॅग ऑफिसर कमांडींग महाराष्ट्र नेवल एरीया (एफओएमए) यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 2021 रोजी नौकानयन स्पर्धेचे उद्घाटन होईल.

स्वातंत्र्याचे 75 वर्ष "आझादी का अमृत महोत्सव" साजरा करण्यासाठी उद्घाटनाच्या दिवशी ऑयस्टर रॉक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत 75 नौकांचे संचलनही केले जाणार आहे. या कार्यक्रमात देशातील 13 पेक्षा अधिक प्रतिष्ठित नौकानयन संघटना सहभागी होणार आहेत.

आयएनडब्लूटीसी(मुंबई), आयएनडब्लूटीसी(गोवा), आयएनडब्लूटीसी(मालाड), आयएनडब्लूटीसी(कोच्ची), आर्मी याचिंग नोड(एवायएन), इलेक्ट्रोनिक्स अँण्ड मॅकेनिकल इंजिनिअरींग सेलींग असोसिएशन  (ईएमईएस) भोपाळ, कोअर ऑफ इंजिनियरींग सेलींग क्लब (सीईएससी), तामिळनाडू सेलींग असोसिएशन (टिएनएसए), गोवा यॉटींग असोसिएशन (जीवायए), नॅशनल डिफेंस अकादमी (एनडीए) आणि नॅशनल सेलींग स्कूल (एनएसएस), भोपाळ यांचा यात समावेश आहे.

वरिष्ठ गटाच्या इतिहासात पहिल्यांदा विंडफॉयलींग (iQFoil), एनएसीआरए 17 आणि काईट बोर्डींग या तीन नव्या ऑलंपिक दर्जाच्या नौका स्पर्धेत दाखल होणार आहेत. इतर वर्गातील सहभागी होणाऱ्या नौका आहेत लेसर (स्टँडर्ड अँड रेडीयल), 470 (Mixed), 49er, 49erFX and RS:X.

 

 

 

 

S.Thakur/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1749309) Visitor Counter : 108


Read this release in: English