विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारत -जर्मन संयुक्त संशोधन कार्यक्रमाद्वारे डॉक्टरेट पदवी मिळवण्याची युवा संशोधकांसाठी  नवीन संधी

Posted On: 07 AUG 2021 3:58PM by PIB Mumbai

 

भारतीय आणि जर्मन संशोधकांमधील संयुक्त सहकार्य  प्रकल्पांच्या माध्यमातून  संशोधक आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक नवीन कार्यक्रम सुरु करण्यात येत असून दोन्ही देशांनी अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वांवर स्वाक्षरी केली आहे.  कारकीर्दीच्या प्रारंभिक काळात  संशोधकांना एक केंद्रित संयुक्त संशोधन कार्यक्रम तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या चौकटीत डॉक्टरेट पदव्या मिळवण्याची संधी हा कार्यक्रम देतो.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), भारत आणि जर्मन संशोधन कार्यालय (DFG) यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन प्रशिक्षण गट (IRTG) नावाच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर स्वाक्षरी केली आहे,. यामुळे  दोन्ही देशांमधील मूलभूत आणि उपयोजित विज्ञानाबाबत ऑक्टोबर 2004 पासूनचे  दीर्घकालीन सहकार्य यापुढेही सुरु राहील. डीएसटी आणि आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय सहकार्य  विभागाचे प्रमुख  एस.के. वार्ष्णे आणि समन्वयित कार्यक्रम आणि पायाभूत सुविधा, डीएफजीचे विभाग प्रमुख डॉ.उलरिक इकॉफ यांनी या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या.

संयुक्त कार्यक्रमांतर्गत, प्रत्येक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रशिक्षण गटाचे परिचालन प्राध्यापकांच्या दोन लहान संघांद्वारे एक भारतातला  आणि दुसरा जर्मनीतील संघाद्वारे केले  जाईल.  प्रत्येक संघात  आयआरटीजीच्या मुख्य संशोधन विषयातील अनुभव असलेले सुमारे 5 ते 10 सदस्य असतील जे डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवतील.  या कार्यक्रमामुळे दोन्ही देशातील डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांचे संशोधन आणि प्रशिक्षण यांमध्ये समन्वय साधता येईल.

कार्यक्रम मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केले आहे  की आयआरटीजी  कार्यक्रमात भाग घेणारे प्राध्यापक भारत आणि जर्मनीमधील एकाच संस्थेतले  असावेत. डीएसटी आणि डीएफजी दोन्ही डॉक्टरल पदांसाठी/फेलोशिप, प्रकल्प विशेष संशोधन संबंधित भागीदार संस्थांना परस्पर संशोधन भेटी, संयुक्त कार्यशाळा, परिषद आणि चर्चसत्रासाठी आयआरटीजी प्रकल्पासाठी निधी पुरवतील.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743553) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi