आदिवासी विकास मंत्रालय

ट्रायफेडचा उद्या चौतिसावा स्थापना दिन

Posted On: 05 AUG 2021 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021

 

ट्रायफेडची स्थापना 6 ऑगस्ट 1987 ला झाली. उद्या ट्रायफेडचा 34 वा स्थापनादिन आहे. आदिवासी उत्पादनांना विशेषतः हस्तकलेची व लाकडांशिवाय अन्य वनोपज उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे आणि त्या माध्यमातून आदिवासी विकास साध्य करणे या उद्देशाने  ट्रायफेडची स्थापना झाली. आदिवासी उत्पादनांशी संबधित बाजारपेठेबद्दल जाणीव जागृती करणे आणि त्या उत्पादनांच्या विपणनातून आदिवासींना जास्तीत जास्त लाभ करून देणे अशी अनेक लक्ष्ये दृष्टीसमोर ठेवून ट्रायफेड हा दिवस योग्य ती प्रसिद्धी करत विशेष प्रकारे साजरा करणार आहे. आदिवासी व ट्रायफेडसाठी कामे करणाऱ्यांचे यश आणि सहकार्य यांची दखलही या कार्यक्रमात घेतली जाईल.

ट्रायफेडच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दलचे सादरीकरण, वनधन पारितोषिकाची घोषणा, आदिवासी व्यवहार मंत्र्यांनी आदिवासी लाभार्थ्यांशी दूरसंवाद पद्धतीने साधलेला संवाद आणि आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा व आदिवासी व्यवहार राज्यमंत्री रेणुका सिंग यांचे  भाषण ही या कार्यक्रमाची विशेष वैशिष्ठ्ये असतील.

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1742770) Visitor Counter : 320


Read this release in: English , Hindi