विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पहिला एम के भान फेलोशिप-यंग रिसर्चर फेलोशिप प्रोग्राम (एमकेबी-वाईआरएफपी), निकाल घोषित
Posted On:
05 AUG 2021 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाने (डीबीटी) आज पहिल्या एमके भान फेलोशिप-यंग रिसर्चर फेलोशिप प्रोग्रामचे (एमकेबी-वाईआरएफपी) निकाल जाहीर केले. प्रख्यात शास्त्रज्ञ आणि जैव तंत्रज्ञान विभागाच्या माजी सचिवांच्या सन्मानार्थ फेलोशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे.
या फेलोशिपसाठी डीबीटीच्या ePromis पोर्टल द्वारे एकूण 358 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 50 संशोधकांची निवड करण्यात आली.
35 वर्षापेक्षा कमी वयाच्या युवा संशोधकांना पीएच.डी. नंतर देशात आयुर्विज्ञान/ जैवतंत्रज्ञान/ संबंधित क्षेत्रातील कोणत्याही शाखेत संशोधन चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने विभागाने एमके भान फेलोशिप-यंग रिसर्चर फेलोशिप कार्यक्रम सुरु केला.
युवा पीएचडी संशोधकांना ही योजना तीन वर्षांसाठी स्वतंत्र संशोधन अनुदान देते. या फेलोशिपमध्ये अत्याधुनिक संशोधन करण्यासाठी भरीव संशोधन/आकस्मिक अनुदानासह 75,000 रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
याप्रसंगी बोलताना, डीबीटीचे सचिव डॉ रेणू स्वरूप म्हणाले, "ही युवा संशोधन फेलोशिप डीबीटीचे माजी सचिव डॉ एम के भान यांना श्रद्धांजली आहे, ज्यांनी नेहमी भावी युवा नेत्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना मार्गदर्शन केले."
निकाल येथे पाहता येईल : https://dbtindia.gov.in/latest-announcement/mk-bhan-young-researcher-fellowship-program-2020-21-results

S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742749)