अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, सीजीएसटी च्या अधिकाऱ्यांनी 31,000 कोटी रुपयांची इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याची 7,200 पेक्षा जास्त प्रकरणे उघडकीस आणली
Posted On:
03 AUG 2021 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021
वस्तू आणि सेवा कर अधिकाऱ्यांनी, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, वस्तू आणि सेवा कर क्षेत्राअंतर्गत, 31,000 हजार कोटी रुपयांची कर घोटाळा आणि इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर करणारी प्रकरणे उघडकीला आणली आहेत. या घोटाळ्यांप्रकरणी, म्हणजेच बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार केल्याप्रकरणी, 7,200 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
याविषयी सविस्तर माहिती देतांना त्यांनी सांगितले की, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क (CBIC) विभागाअंतर्गत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकाऱ्यांनी खालील प्रकरणी इनपुट टॅक्स क्रेडीजचा गैरवापर झाल्याचे उघड केले आहे. ते पुढीलप्रमाणे : -
S. No.
|
Period
|
No. of Cases
|
Quantum involved
(in Rs. crore)
|
1
|
2020-21
|
7,268
|
31,233.40
|
घोटाळे रोखण्यासाठी सरकारने काही पाऊले उचलली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे
- नव्या नोंदणी आवेदन प्रक्रियेसाठी आधार क्रमांकांची पडताळणी करण्याची सुरुवात.
- नवी नोंदणी करण्यासाठी अर्ज केलेल्या आवेदकाची रद्द करण्यात आलेली / सध्या अस्तित्वात असलेल्या नोंदणीची पडताळणी करण्याची सुविधा;
- विभागाच्या लक्षात आलेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेल्या करदात्याची नोंदणी स्थगित/रद्द करण्याच्या तरतूदी.
- व्यावसायिक गुप्तचर वार्ता विभागाकडून मिळालेली माहिती आणि त्या माहितीचा CBIC ने केलेला पाठपुरावा, या आधारे जीएसटीएन ने सामूहिक नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया.
अधिक माहितीसाठी इथे पहा :
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1741983)
Visitor Counter : 276