युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

खेळांमध्ये नैपुण्य असलेल्या नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचा क्रीडा प्रशासनात समावेश करायला हवा: हॉकी ऑलिम्पिकपटू डॉ. एम. पी . गणेश


इंडिया ब्लेझर मिळवणे आणि परिधान करणे, हा माझा सर्वात मोठा सन्मान होता : निपुण क्रिकेटपटू अंजुम चोप्रा

Posted On: 30 JUL 2021 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2021

टोकियो ऑलिम्पिक सुरु असून संपूर्ण देश  क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक आहे. याच अनुषंगाने पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) आणि प्रादेशिक लोक संपर्क विभाग (आरओबी) चंदीगड यांनी आज 'क्रीडा क्षेत्रात महिला ' या विषयावर वेबिनार आयोजित केले होते.  ऑलिम्पियन आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी कर्णधार डॉ. एम पी  गणेश, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार अंजुम चोप्रा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रख्यात खेळाडू अतिथी वक्ते म्हणून सहभागी झाले होते. हे दोन्ही वक्ते त्यांच्या क्षेत्रातील पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू आहेत.

आपल्या स्वागतपर  भाषणात  पीआयबी, चंदीगडच्या अतिरिक्त महासंचालक देवप्रीत सिंग यांनी आपल्या मार्गात येणाऱ्या विविध अडथळ्यांवर मात करून देशाचा गौरव वाढवणाऱ्या  महिला खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.

डॉ. मुलेरा पूवय्या  गणेश हे भारतीय संघाचे प्रशिक्षकही होते आणि  1973 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेत्यांना गौरवण्यात आले होते. अंजुम चोप्रा या क्रिकेट विश्लेषक असून भारतातील दूरचित्रवाणीवरील पहिल्या  महिला समालोचक आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल 2007 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि  2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये क्रीडा हा अनिवार्य विषय बनवायला हवायामुळे भारताला प्रतिभावान खेळाडू तयार करण्यास मदत होईल, असे गणेश म्हणाले.  प्रशासनात क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले  , "खेळांमध्ये नैपुण्य असलेल्या नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचा   क्रीडा प्रशासनात समावेश करायला हवा.."

श्रोत्यांच्या  एका प्रश्नाला उत्तर देताना  अंजुम म्हणाल्या, प्रत्येकाला प्रोत्साहनाची गरज आहे, मग तो पुरुष असो किंवा महिला खेळाडू  असेल. मात्र  पुरुष आणि महिलांचे  जग वेगळे आहे. खेळ सामान्यतः पुरुषांशी संबंधित  मानले जातात. आमची पिढी ही धारणा बदलेल.

एक उत्कृष्ट  क्रिकेटपटू, अभिनेता किंवा समालोचक यापैकी कुठल्या भूमिकेने  सर्वात जास्त आनंद दिला, यावर उत्तर देताना अंजुम म्हणाल्या "इंडिया ब्लेझर मिळवणे आणि परिधान करणे हा माझा सर्वात मोठा सन्मान होता ".

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1740871) Visitor Counter : 181


Read this release in: English , Urdu , Hindi