भूविज्ञान मंत्रालय

पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळापासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना

Posted On: 30 JUL 2021 4:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2021

हिंद महासागराने  अलीकडे तापमानवाढीत वेगवान वाढ अनुभवली असून अरबी समुद्रात सर्वात तीव्र तापमानवाढ दिसून आली ,  ज्यामुळे  अलिकडच्या काळात चक्रीवादळाची वारंवारता वाढली आहे.  विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भू विज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार )जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की पश्चिम किनारपट्टीलगतच्या पाच राज्यांसाठी (, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ) , केंद्रशासित प्रदेश (उदा., दमण , दीव, दादरा आणि नगर हवेली) आणि केंद्रशासित प्रदेश, लक्षद्वीप बेटासाठी एक प्रगत चक्रीवादळ पूर्व इशारा प्रणाली आहे.  पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात सात चक्रीवादळ इशारा केंद्रांद्वारे हे साध्य झाले आहे. तीन क्षेत्रीय चक्रीवादळ सूचना केंद्रे (ACWCs) चेन्नई, मुंबई आणि कोलकाता येथे आहेत आणि चार चक्रीवादळ सूचना केंद्रे (CWCs) थिरुअनंतपुरम, विशाखापट्टणम, अहमदाबाद आणि भुवनेश्वर येथे आहेत. संबंधित क्षेत्रासाठी कार्यरत चक्रीवादळ सूचना देण्याची जबाबदारी एसीडब्ल्यूसी आणि सीडब्ल्यूसीची  आहे.

पश्चिम किनारपट्टीलगतच्या  ACWCs आणि CWCs च्या जबाबदारीचे क्षेत्र खालील तक्त्यात दाखवले आहे:

Centre

Coastal area*

Maritime State/UT

ACWC Mumbai

State: Maharashtra & Goa

State: Maharashtra & Goa

CWC Thiruvananthapuram

State: Kerala & Karnataka

UT: Lakshadweep

State: Kerala & Karnataka

UT: Lakshadweep

CWC Ahmedabad

State: Gujarat

UT: Dadra-Nagar Haveli-Daman-Diu

State: Gujarat

UT: Dadra-Nagar Haveli-Daman-Diu

किनारपट्टीची  जबाबदारी किनारपट्टीपासून 75 कि.मी.पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

 या व्यतिरिक्त  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे (एनडीएमए) देशातील 8 चक्रीवादळ प्रवण राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोका  कमी करण्याच्या प्रकल्प (एनसीआरएमपी) चा एक भाग म्हणून पाच पश्चिमी किनारपट्टी राज्यात (गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र) चक्रीवादळाचा धोका कमी करणाऱ्या पुढील  पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत .

मंत्रालयाच्या वातावरण आणि हवामान संशोधन-मॉडेलिंग ऑब्झर्व्हिंग सिस्टम व सर्व्हिसेस (एसीआरओएसएस) या  योजनेंतर्गत चक्रीवादळांचा अंदाज वर्तवणाऱ्या क्षमता सुधारण्याचे काम भारतीय हवामानशास्त्र विभागात (आयएमडी) राबवण्यात येत आहे. . एसीआरओएसएस अंतर्गत वातावरण निरीक्षण नेटवर्क (एओएन), पूर्वानुमान प्रणाली अद्ययावतीकरण (यूएफएस), हवामानविषयक  सेवा (डब्ल्यूसीएस) आणि ध्रुवीय डॉपलर हवामान रडार (पीडीडब्ल्यूआर) कार्यान्वित करणे या आयएमडीच्या 4 उप-योजनांसाठी मागील पाच आर्थिक वर्षांतला  एकत्रित खर्च  खालीलप्रमाणे आहे:-

Name of Sub-scheme

Total expenditure during the Financial-Year

(Rs. in Crores)

2016-17

2017-18

2018-19

2019-20

2020-21

ACROSS-IMD

(AON, UFS, WCS & PDWR)

144.08

134.09

175.94

206.04

150.33

 

तसेच, पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांमध्ये  एनसीआरएमपी अंतर्गत चक्रीवादळ धोका कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा मालमत्ता  1156.57 कोटी रुपये खर्चासह निर्माण केल्या जात आहेत . यात केंद्र सरकारचा  हिस्सा: 925.95 कोटी ; राज्य हिस्सा: 231.62 कोटी रुपये असून 614.57 कोटी रुपये आतापर्यंत वापरण्यात आले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत, चक्रीवादळांशी संबंधित आपत्तींचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पूर्वसूचना सेवांमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे.  आयएमडीने चक्रीवादळांचा अचूक अंदाज वर्तवण्यात आपली क्षमता दाखवून दिली आहे.

गेल्या काही वर्षात चक्रीवादळाच्या अंदाजाची  अचूकता लक्षणीयरीत्या सुधारल्याचे चक्रीवादळाच्या वेळी दिसून आले आहे

अलिकडच्या वर्षांत, जीवितहानी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

तसेच, देशातील 13 किनारपट्टी राज्यांमधील (पूर्व आणि पश्चिम  दोन्ही ) एनसीआरएमपी फेज -II  अंतर्गत चक्रीवादळासाठी वेब आधारित डायनॅमिक कॉम्पोजिट रिस्क ऍटलस  (वेब-डीसीआरए) आणि निर्णय सहाय्य प्रणाली (डीएसएस)  विकसित केली जात आहे , ज्यात समुद्र पातळीपासून 10 मीटर उंचीवर असलेल्या क्षेत्रासाठी वादळाच्या तीव्रतेत वाढ आणि पुराचा अंदाज वर्तवणे  यांचा समावेश आहे.

 

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1740713) Visitor Counter : 288


Read this release in: English , Urdu