नौवहन मंत्रालय

देशांतर्गत जहाज विधेयक 2021 लोकसभेत संमत

Posted On: 29 JUL 2021 8:38PM by PIB Mumbai

 

आंतरदेशीय जहाज  विधेयक 2021 आज लोकसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांनी गेल्या गुरुवारी हे विधेयक सभागृहात मांडले होते.

या विधेयकान्वये देशभरात, राज्यांचे वेगवेगळे कायदे असण्यापेक्षा देशाचा एकच, एकीकृत कायदा लागू होऊ शकेल. या कायद्याअंतर्गत देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र देशात कुठेही वैध समजले जाईल आणि त्यानंतर राज्यांच्या वेगळ्या परवानग्यांची गरज पडणार नाही.

या विधेयकामुळे, जहाजे आणि त्यांच्यावरील कर्मचारी यांच्या माहितीचा एक मध्यवर्ती डेटाबेस इलेक्ट्रॉनिक पोर्टलवर तयार होऊ शकेल.

या विधेयकानुसार, जहाजांना स्वस्त आणि सुरक्षित दिशादर्शन सुविधा, जीविताची तसेच मालाची संरक्षण सुविधा देण्याचा प्रस्ताव असून देशांतर्गत जलमार्ग आणि दिशादर्शन विषयक कायद्यांची एकसमान अंमलबजावणी करण्याची तरतूद आहे.

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1740486) Visitor Counter : 267


Read this release in: English , Hindi