गृह मंत्रालय

तौते आणि यास चक्रीवादळामुळे झालेली जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान

Posted On: 28 JUL 2021 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जुलै 2021

तौते चक्रीवादळाचा गुजरात, महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक,केरळ या पाच राज्यांना आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशाला फटका बसला. ओदिशा,पश्चिम बंगाल आणि झारखंड या तीन राज्यांना यास चक्रीवादळाचा तडाखा बसला. यासंदर्भात बाधित राज्यांकडून, परिस्थितीबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून नुकसानीचा तपशील याप्रमाणे आहे-   

(Provisional)

State

Human lives lost

Houses/ huts damaged

Cattle

lost

Cropped area affected

(in ha.)

Fishermen’s Boats & nets damaged

Gujarat – cyclone ‘Tauktae’

67

88,910

8629

149270

475 – boats

Maharashtra – cyclone ‘Tauktae’

22

44,091

34

16787

1215 - boats & 21836 – nets

DNH and Daman & Diu – cyclone ‘Tauktae’

1

1,203

4

51.22

29 – boats

Goa – cyclone ‘Tauktae’

3

2,004

160

227

--

Karnataka– cyclone ‘Tauktae’

6

473

2

215.23

263 - boats & 324 – nets

Kerala– cyclone ‘Tauktae’

 

11

5,034

91

24433

125 - boats & 282 - nets

Odisha – Cyclone ‘Yaas’

3

18,094

72

5672.99

40 - boats &

  14 – nets

West Bengal – Cyclone ‘Yaas’

--

Approx

3 lakh

11740

170891

4353 - boats &

 18708 – nets

Jharkhand – Cyclone ‘Yaas’

4

1,508

3

74.94

--

आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांवर आहे.त्यांच्या प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी बाधित राज्यांना, एसडीआरएफ, राज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून, विहित प्रक्रियेनुसार, वित्तीय सहाय्य पुरवले जाते.

 गोवा, केरळ आणि झारखंड  या राज्यांकडून वित्तीय सहाय्यासाठी मागणी प्राप्त झालेली नाही. महाराष्ट्राकडून 92.37  कोटी रुपये, कर्नाटक कडून 10.89 कोटी रुपये, पश्चिम बंगालकडून 4522 कोटी, गुजरातकडून 9836.01 कोटी आणि दादरा नगर हवेली, दमण दीव कडून 56.53 कोटी रुपयांच्या वित्तीय सहाय्याची मागणी करण्यात आली आहे. मदतीच्या उपाययोजनांसाठी ओडिशा सरकारने वित्तीय सहाय्याची मागणी केलेली नाही.

तौते आणि यास चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने गुजरातसाठी 1000 कोटी, ओदिशासाठी 500 कोटी, पश्चिम बंगालसाठी 300 कोटी आणि झारखंड साठी 200 कोटी रुपयांचे अतिरिक्त वित्तीय सहाय्य,एनडीआरएफद्वारे  जारी केले. या वादळामुळे उद्भवलेल्या  परिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी हा निधी जारी करण्यात आला.याशिवाय एसडीआरएफसाठी  2021-22 करिता केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ता म्हणून 8873.60 कोटी रुपये केंद्र सरकारने, 29 एप्रिल 2021 ला, चक्रीवादळ ग्रस्त राज्यांसह सर्व राज्यांसाठी आधीच जारी केले.

राष्ट्रीय आपत्तीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि त्वरित प्रतिसादासाठी राष्ट्रीय,राज्य आणि जिल्हा स्तरावर संस्थात्मक यंत्रणा आहेत. केंद्र सरकारने आपत्ती पूर्व इशारा देणारी बळकट  यंत्रणा उभारली असून हवामान अंदाजाची अचूकताही वाढली आहे. जनतेमध्ये जागृती साठी मॉक ड्रील आणि जागृती करणारे कार्यक्रम नियमित आयोजित केले जातात.

केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या उपाययोजनांमुळे आपत्ती व्यवस्थापन उपाय,सज्जता, अटकाव आणि प्रतिसाद यंत्रणा यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून त्यामुळे देशात नैसर्गिक आपत्ती दरम्यानचे नुकसान कमी राखता येत  आहे. आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे.

केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्य सभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739996) Visitor Counter : 185


Read this release in: English , Urdu , Bengali