सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

सामाजिक क्षेत्रातील योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण

Posted On: 28 JUL 2021 5:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जुलै 2021

सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये माहिती-देखरेख, मूल्यांकन आणि सामाजिक लेखापरीक्षण (आय-एमईएसए) नावाची एक योजना तयार केली आहे. या योजनेंतर्गत, आर्थिक वर्ष 2021-22 पासून विभागातील सर्व योजनांचे सामाजिक परीक्षण केले जाईल. हे सामाजिक परीक्षण राज्यांच्या सामाजिक परीक्षण विभाग (एसएयू) आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेच्या माध्यमातून केले जाते.

अशी माहिती सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

 

 M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1739983) Visitor Counter : 393


Read this release in: English , Urdu