संरक्षण मंत्रालय
सशस्त्र दलातील रिक्त पदे
Posted On:
26 JUL 2021 5:17PM by PIB Mumbai
सशस्त्र दलात रिक्त असणाऱ्या पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
रिक्त जागा भरून काढण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये, निरंतर प्रतिमा उंचावणे, करिअर मेळावे व प्रदर्शनांमध्ये सहभाग तसेच आव्हानात्मक व समाधानकारक कारकीर्द निवडण्याच्या फायद्यांबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रसिद्धी अभियानाचा समावेश आहे.
तरुणांना सशस्त्र दलात सामील होण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी, शाळा / महाविद्यालये / इतर शैक्षणिक संस्था आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) शिबिरांमध्ये नियमितपणे प्रेरणादायी व्याख्याने आयोजित केली जातात.
याशिवाय सशस्त्र दलामधील सेवा आकर्षक करण्यासाठी शासनाने सशस्त्र दलात पदोन्नतीची शक्यता सुधारण्याबरोबरच रिक्त जागा भरण्यासारखी विविध पावले उचलली आहेत.
लष्करामधील जेसीओ / ओआर, हवाई दलात एअरमेन (नेपाळसह) आणि नौदलामधील नाविकांची राज्यवार संख्या खालीलप्रमाणे आहे:
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत नीरज डांगी यांना लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
Jaydevi PS/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739113)
Visitor Counter : 194