PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 24 JUL 2021 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 24 जुलै 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 42.78 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार एकूण 52,34,188 सत्रांमध्ये, 42,78,82,261 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 42,67,799 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3,05,03,166 तर गेल्या 24 तासात 35,087 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 97.35% झाला आहे.

भारतात गेल्या 24 तासात 39,097 नव्या रुग्णांची नोंद झाली.

सलग 27 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.

भारतात सक्रीय रुग्णसंख्येतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 4,08,977 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.31% आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 16,31,266 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 45.45 कोटींपेक्षा अधिक (45,45,70,811) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी 2.22% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी 2.40% आहे. दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर सलग 33 व्या दिवशी 3% पेक्षा कमी तर साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर सलग 47 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.

इतर अपडेट्स :

  • देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोविड सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 21 जून 2021 रोजी सुरु झाला आहे. लसींची अधिक उपलब्धता, उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्याविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगावू सूचना देणे तसेच त्याद्वारे लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करण्याचा प्रयत्न करत, लसीकरण मोहीमेला गती देण्यात आली आहे.राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोविड लसी पुरवत आहे. लसीकरणाच्या सध्या सुरु असलेल्या टप्प्यात, केंद्र सरकार देशात उत्पादित होणाऱ्या 75% लसी खरेदी करणार असून, त्यांचा मोफत पुरवठा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करणार आहे. आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 44.53 कोटींपेक्षा अधिक (44,53,86,390) लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. तसेच, आणखी 85,58,360 लाख मात्रा लवकरच दिल्या जाणार आहेत.

 

 

 

Jaydevi PS/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738704) Visitor Counter : 124


Read this release in: English , Hindi , Punjabi