पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

जून, 2021 चा मासिक उत्पादन अहवाल;


जून 2021 मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन जून 2020 च्या तुलनेत 19.52% अधिक ; 4.92% अधिक कच्च्या तेलावर प्रक्रिया

Posted On: 23 JUL 2021 5:34PM by PIB Mumbai

 

क्रूड तेलाचे उत्पादन:

जून 2021मध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन 2481.66 टीएमटी एवढे होते, जे महिन्याच्या लक्ष्यापेक्षा 2.26%ने कमी आहे आणि जून 2020 च्या उत्पादनाच्या तुलनेत ते 1.79 %ने. कमी आहे. एप्रिल ते जून या काळात कच्च्या तेलाचे एकूण उत्पादन 7412..87 टीएमटी होते, जे लक्ष्य गाठण्यासाठी आणि पेक्षा कमी आहे,तसेच मागील वर्षाच्या याच कालावधीतील उत्पादनापेक्षा अनुक्रमे 3.42%आणि 2.24% कालावधीच्या तुलनेत कमी आहे.

कच्च्या तेलाचा जून 2021 महिन्यातील युनिटनिहाय आणि राज्यनिहाय उत्पादन तपशील सारणी क्रमांक -1 दिला आहे आणि एप्रिल ते जून 2021 या कालावधीतील आणि गतवर्षीच्या एकूण कालावधीसाठी युनिटनिहाय कच्च्या तेलाचे उत्पादन सारणी -क्रमांक 1 आणि आकृती -1 मध्ये महिन्यानुसार दर्शविली गेली आहे.

Oil Company

Target

June (Month)

April-June (Cumulative)

2021-22 (Apr-Mar)*

2021-22

2020-21

% over last year

2021-22

2020-21

% over last year

Target*

Prod.*

Prod.

Target*

Prod.*

Prod.

ONGC

20272.88

1656.04

1621.92

1667.52

97.27

4955.11

4812.14

5068.40

94.94

OIL

3182.60

249.64

246.52

241.70

102.00

751.22

742.34

746.40

99.46

PSC Fields

7718.52

633.38

613.22

617.79

99.26

1876.23

1858.39

1860.49

99.89

Total

31173.99

2539.06

2481.66

2527.00

98.21

7582.56

7412.87

7675.29

96.58

नैसर्गिक वायूचे उत्पादन जून 2021 मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन 2777.43 एमएमएससीएम होते, जे जून 2020 च्या उत्पादनाच्या तुलनेत 19.52% जास्त आहे परंतु मासिक उद्दीष्टापेक्षा 5.26% कमी आहे. एप्रिल ते जून 2021 या कालावधीत एकूण नैसर्गिक वायु उत्पादन 8168..56 एमएमएससीएम होते जे मागील वर्षाच्या याच कालावधीत उत्पादनाच्या तुलनेत 20.39% टक्क्यांनी जास्त आहे परंतु या कालावधीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 3.52% ने कमी आहे. युनिट-निहाय आणि राज्य-निहाय नैसर्गिक वायू उत्पादन सारणी-2- मध्ये दिले आहे. जून 2021 महिन्यात युनिटनिहाय नैसर्गिक वायूचे उत्पादन आणि एप्रिल-जून या कालावधीत 2021 च्या संचयीकरणासाठी, मागील वर्षीच्या याच कालावधीतील उत्पादन सारणी -2 आणि आकृती -2 मध्ये महिन्यानुसार दर्शविली गेली आहे

जून 2021 मध्ये ओएनजीसीचे नामांकन गटांमधील नैसर्गिक वायु उत्पादन1684.85 एमएमएससीएम होते, जे महिन्याच्या उद्दीष्टापेक्षा 11.70% कमी आहे आणि जून 2020च्या तुलनेत ते 7.37% कमी आहे. एकूण उत्पादन 5052.38 एमएमएससीएम होते, जे मागील वर्षाच्या याच कालावधीत अनुक्रमे उत्पादन कालावधीपेक्षा 9.3% आणि लक्ष्याच्या नुसार अनुक्रमे 5.57% कमी आहे.

जून 2021 मध्ये नामनिर्देशन गटात ओआयएलचे नैसर्गिक वायू उत्पादन 230.14 एमएमएससीएम होते, जे जून 2020च्या उत्पादनाच्या तुलनेत 4.97% जास्त आहे परंतु महिन्याच्या उद्दिष्टापेक्षा 5.16% कमी आहे. एप्रिल ते जून 2021 या काळात ओआयएलद्वारे एकत्रित नैसर्गिक वायूचे उत्पादन 675.20 एमएमएससीएम होते, जे मागील वर्षाच्या याच कालावधीत उत्पादनाच्या तुलनेत 3.95 टक्क्यांनी जास्त आहे परंतु कालावधीतील लक्ष्यापेक्षा 7.90 % कमी आहे.

जून 2021 दरम्यान सीपीएसई रिफायनरीजचे प्रक्रिया केलेल्या कच्चे तेलाचे उत्पादन 10043.15 टीएमटी होते. ते महिन्याच्या लक्ष्यापेक्षा 14.83% कमी होते आणि जून 2020 च्या तुलनेत 2.67% कमी होते. एप्रिल ते जून 2021दरम्यान संचयी क्रूड थ्रूपूट 31708.78 टीएमटी होते जे मागील वर्षाच्या 22.89 % जास्त आहे. परंतु या वर्षीच्या कालावधीपेक्षा 8.91% कमी आहे.

जून 2021 मध्ये पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन 19172.25 टीएमटी होते, जे जून 2020 च्या उत्पादनाच्या तुलनेत 2.39% जास्त आहे परंतु महिन्याच्या लक्ष्याच्या तुलनेत 5.18% कमी आहे. एप्रिल ते जून, 2020 या कालावधीत एकत्रित उत्पादन 59991.63 टीएमटी होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत 15.45 % जास्त होते परंतु कालावधीच्या लक्ष्यापेक्षा 2.97 % कमी आहे.

पेट्रोलियम उत्पादनांचे एककनिहाय सारणी-5 मध्ये देण्यात आले आहे. जून -2021 महिन्यातील कंपनी-निहाय उत्पादन आणि एप्रिल-जून, 2021या कालावधीत एकत्रितपणे मागील वर्षाच्या याच कालावधीतील हीच आकडेवारी टेबल -4 मध्ये दर्शविली आहे.

Oil Company

Target

June (Month)

April-June (Cumulative)

2021-22 (Apr-Mar)*

2021-22

2020-21

% over last year

2021-22

2020-21

% over last year

Target*

Prod.*

Prod.

Target*

Prod.*

Prod.

ONGC

23335.10

1908.05

1684.85

1818.97

92.63

5603.27

5052.38

5350.60

94.43

OIL

2949.65

242.65

230.14

219.24

104.97

733.14

675.20

649.52

103.95

PSC Fields

11834.60

780.77

862.44

285.61

301.97

2130.57

2440.99

785.02

310.94

Total

38119.35

2931.48

2777.43

2323.81

119.52

8466.98

8168.56

6785.14

120.39

Note:  Totals may not tally due to rounding off. *: Provisional

जून 2021 मध्ये ऑईलच्या रिफायनरीजद्वारे पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन 18850.13 टीएमटी होते, जे जून 2020 च्या उत्पादनाच्या तुलनेत 2.69% जास्त आहे परंतु महिन्याच्या लक्ष्याच्या तुलनेत 5.01% कमी आहे. एप्रिल ते जून 2021 या कालावधीतील एकत्रित उत्पादन 58970 .06 टीएमटी होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत 15.67% जास्त होते परंतु कालावधीच्या लक्ष्यापेक्षा 2.89% कमी आहे.

जून 2021 मध्ये फ्रॅक्शनॅटर्सनी काढलेले पेट्रोलियम उत्पादन 322.11 टीएमटी होते, जे महिन्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 14.08 कमी आहे आणि महिन्याच्या उद्दिष्टापेक्षा 12.71% कमी आहे. एप्रिल ते जून 2021 या कालावधीत एकत्रित उत्पादन 1021.57 टीएमटी होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत 3.92% जास्त होते परंतु कालावधीच्या लक्ष्यापेक्षा 7.05% कमी आहे.

 

सारणी पहाण्यासाठी येथे क्लिक करा:

***

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1738206) Visitor Counter : 195


Read this release in: Tamil , English , Hindi