सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
एमएसएमईच्या नवीन उपक्रमांची उभारणी
Posted On:
19 JUL 2021 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2021
केंद्र सरकारने 1 जुलै 2020 रोजी उद्योग आधार मेमोरँडम (यूएएम) च्या जागी उद्यम नोंदणी (यूआर) आणून एमएसएमईच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ केली आहे. उद्यम नोंदणी विनामूल्य, पारदर्शक, ऑनलाइन आणि अडचण मुक्त आहे आणि ती स्वयं-घोषणेवर आधारित आहे. यासाठी कोणत्याही दस्तऐवजांची आवश्यकता नाही आणि आयटीआर आणि त्याचे जीएसटीआयएनबरोबर स्वयंचलित एकत्रीकरण आहे. कोविड -19 महामारीच्या दुसर्या लाटेदरम्यान एमएसएमईने यूआर पोर्टलवर नोंदणी सुरू ठेवली होती.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) / ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम (आरईजीपी) / मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (मुद्रा ) यासारख्या योजनांचा तसेच कोविड 19 महामारीमुळे एमएसएमईंना सामोरे जावे लागलेल्या समस्यांवर दिलासा देण्यासाठी करण्यात आलेल्या घोषणांचा लाभ एमएसएमई घेऊ शकतात . जुलै 2020-21 पर्यंत पीएमईजीपी अंतर्गत प्रकल्प व रोजगार निर्मितीची संख्या अनुक्रमे 91,054 आणि 7,28,432 आहे.
सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736859)
Visitor Counter : 229