आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        कोविड-19 लसीकरण अद्ययावत स्थिती
                    
                    
                        
41.99 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रसासित प्रदेशांना वितरीत
सध्या राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रूग्णालयांकडे 2.56 कोटी लसी शिल्लक
                    
                
                
                    Posted On:
                18 JUL 2021 10:42AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोविड सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 21 जून 2021 रोजी सुरु झाला आहे. लसींची अधिक उपलब्धता, उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्याविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगावू सूचना देऊन, त्याद्वारे लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करण्याचा प्रयत्न, यातून लसीकरण मोहीमेला गती देण्यात आली आहे.

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोविड लसी पुरवत आहे.नव्या टप्प्यात देशातील 75 टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करत असून त्या राजे आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवल्या जात आहेत.
आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 41.99 कोटींपेक्षा अधिक (41,99,68,590)  लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. तसेच, आणखी 15,75,140 लाख मात्रा लवकरच दिल्या जाणार आहेत.
यापैकी, एकूण 39,42,97,344 मात्रांचा वापर करण्यात आला आहे( वाया गेलेल्या लसींसह) असे आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार स्पष्ट होते.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.56 कोटींपेक्षा जास्त (2,56,71,246) लसींच्या मात्रा शिल्लक आहेत.
***
MC/RA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1736536)
                Visitor Counter : 265