नागरी उड्डाण मंत्रालय
विभागीय हवाई कनेक्टिविटीला चालना देणाऱ्या आठ नव्या हवाई मार्गांचे उद्घाटन
Posted On:
16 JUL 2021 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2021
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यानच्या प्रवासासाठीच्या नवीन आठ हवाई मार्गांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जबलपूरचे खासदार राकेश सिंग, नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंग खरोला आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
"मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात येथील लोकांचे नवीन विमान उड्डाणांचा लाभ झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो”, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या वेळी म्हणाले. याशिवाय 18 जुलै पासून दिल्ली-जबलपूर या मार्गावर अजून विमानउड्डाणे सुरू होतील, तसेच खजुराहो-दिल्ली-खजुराहो या मार्गावरही ऑक्टोबर 2021 पासून आणखी विमानउड्डाणे सुरू होतील असे त्यांनी सांगितले. देशांतर्गत प्रदेश हवाई मार्गाने जोडण्यास प्राधान्य देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि ‘उडेगा देश का आम आदमी’ म्हणजेच UDAN/उडान हा पंतप्रधानांचा दृष्टिकोण नवीन उंचीवर नेऊ, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या सर्व आठ नवीन मार्गांवर एम/एस स्पाईसजेटतर्फे विमानउड्डाणे सुरू होतील. ग्वाल्हेर-मुंबई-ग्वाल्हेर, ग्वाल्हेर-पुणे-ग्वाल्हेर,जबलपूर-सुरत-जबलपुरआणि अहमदाबाद-ग्वाल्हेर-अहमदाबाद असे हे आठ मार्ग आहेत.
उडान या योजनेतील मार्गामधील ग्वाल्हेर हा मध्य प्रदेशातील पहिल्या हवाईतळापैकी एक आहे, आणि अधिकच्या विभागीय हवाई मार्गांमुळे वाढीला लागणाऱ्या हवाई वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि जम्मू या शहरांशी ग्वाल्हेर उडानयोजनांतर्गत हवाईमार्गाने जोडलेले आहे तसेच ते नियमित हवाईमार्गाने मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या शहरांशीही जोडले गेलेले आहे. ग्वाल्हेर फोर्ट, सास बहू मंदिर, मोहम्मद गौंसची कबर, फुलबाग, गुजरी महल वस्तुसंग्रहालय, तेली का मंदिर, ग्वाल्हेर प्राणीसंग्रहालय, मोती महाल आणि ही जय विलास पॅलेस अशासारख्या अनेक ऐतिहासिक इमारतींसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. नवीन हवाई मार्गामुळे ग्वाल्हेर हे मध्य प्रदेशातील पर्यटनाच्या शहराला हवाई कनेक्टिव्हिटीचा आधार मिळेल तसेच भारतातील महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या व्यापारी केंद्रांत ते जोडले जाणार असल्यामुळे आर्थिक उलाढालीलाही चालना मिळेल.
देशातील टीयर-2 आणि टीयर-3 दर्जांच्या शहरांची महानगरांसोबतची कनेक्टिविटी वाढवण्याचे केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयाचे उद्दिष्ट या हवाई मार्गांमुळे साध्य होईल. या उद्घाटनानंतर मध्य प्रदेशातील जबलपूर हवाईतळ, बेंगलोर हैदराबाद आणि पुणे या नियमित हवाई मार्गे आणि बिलासपुर योजनेंतर्गत मार्गाने जोडला जाईल. जबलपूर हे मध्यप्रदेशचे प्रशासकीय आणि शैक्षणिक केंद्र आहे. धुआंधार धबधबा, मदन महल किल्ला, बॅलन्सिंग रॉक, बार्गी धरण, गुरुद्वारा ग्वारीघाट साहीब, डुमना नेचर रिझर्व पार्क अशा खास वैशिष्ट्यांमुळे हे शहर म्हणजे मुख्य पर्यटन केंद्रसुद्धा आहे.
अस्तित्वात असलेले देशांतर्गत हवाई जाळे अधिक मजबूत करण्याचे तसेच उडान योजनेचे ‘सब उडे सब जुडे’ हे उद्दिष्ट या मार्गांच्या उद्घाटनामुळे साध्य होईल याशिवाय स्थानिक अर्थव्यवस्था आणि पर्यटन याला चालना देणे ही उद्दिष्टेही त्यामुळे सफल होतील.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736290)
Visitor Counter : 313