अर्थ मंत्रालय

दीर्घायुष्याच्या वित्तीय नियोजनासाठी तज्ञ समितीची स्थापना

Posted On: 14 JUL 2021 7:23PM by PIB Mumbai

 

भारतातील वित्तीय उत्पादने, वित्तीय सेवा विकसित करुन त्यांचे नियमन करणे तसेच भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात एक वित्तीय संस्था म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी, एकात्मिक नियमन केंद्र म्हणून, एका आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची (IFSCA) स्थापना करण्यात आली आहे.

एका जागतिक अंदाजानुसार, जगात, सध्या एक अब्ज लोक सिल्व्हर जनरेशन म्हणजेच, 60 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोवृध्द लोकांचा जागतिक समुदाय, मध्ये असून, या समुदायाची एकूण क्रयशक्ती 15  ट्रीलियन डॉलर्स इतकी आहे आणि ती भविष्यात वाढतच जाणार आहे. वैद्यकशास्त्रात तसेच तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे सरासरी आयुर्मानात वाढ झाली असल्याने वृध्द नागरिकांची संख्या वाढली आहे. एका अंदाजानुसार, वर्ष 2040 पर्यंत जगभरात, 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांपेक्षा वृद्धांची संख्या अधिक असेल. या लोकसांख्यिक बदलामुळे अनेक क्षेत्रात, विशेषतः मालमत्ता व्यवस्थापन, आरोग्य, विमा आणि इतर गुंतवणूक क्षेत्रात अनेक आव्हाने त्याचसोबत अनेक संधीही उपलब्ध होणार आहेत.

या आव्हानांचा सामना करण्यासाठी दीर्घायुष्य वित्तीय केंद्र सुरु करण्याचा हा एक प्रयत्न असून, त्यासाठी GIFT IFSC ने एका तज्ञ समितीची स्थापना केली आहे. हे दीर्घायुष्य वित्तीय केंद्र कसे विकसित केले जावे याचा दृष्टीकोन मांडत त्याविषयीचा आराखडा देण्याची जबाबदारी IFSCA कडे देण्यात आली आहे.

या समितीचे सहअध्यक्षपद  बँक ऑफ अमेरिका च्या भारतीय शाखेच्या अध्यक्षा आणि प्रमुख श्रीमती काकू नखाते, आणि न्यू इंडिया अशूअरन्स कंपनी लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री गोपालन  श्रीनिवासन यांच्याकडे देण्यात आले आहे. समितीच्या सदस्यांमध्ये, देशातील विविध दीर्घायुष्य वित्तीय व्यवस्था, जसे की बँकिग, विमा, संपत्ती व्यवस्थापन, फिनटेक, कायदेविषयक संस्था, अनुपालन आणि व्यवस्थापन सल्लागार अशा क्षेत्रातील प्रमुखांचा समावेश आहे.

खालील वेबलिंकवर या समितीची सविस्तर  माहिती बघता येईल:

https://ifsca.gov.in/IFSCACommittees

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735585) Visitor Counter : 219


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil