आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाची अद्ययावत माहिती
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 38.60 कोटी पेक्षा अधिक लसीकरणाच्या मात्रा पुरविण्यात आल्या
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे आणि खासगी रुग्णालयांमध्ये अद्याप 1.44 कोटी पेक्षा अधिक लसींच्या मात्रा उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
11 JUL 2021 2:25PM by PIB Mumbai
देशभरातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नवीन टप्प्याला 21 जून 2021 पासून प्रारंभ झाला आहे. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती देण्यात आली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना देण्यात आली आहे, जेणेकरून ते लसीकरणाचे अधिक उत्तम प्रकारे नियोजन करू शकतील आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा उपलब्ध करून देत, केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांकडून 75 % लसींची खरेदी करेल आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा (मोफत) पुरवठा केला जाईल.
आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 38.60 कोटींपेक्षा अधिक (38,60,51,110) लसींच्या मात्रा सर्व स्रोतांच्या माध्यमांतून पुरविण्यात आल्या आहेत आणि यापुढे 11,25,140 मात्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून 37,16,47,625 वापरल्या गेल्या आहेत.
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 1.44 कोटींपेक्षा अधिक (1,44,03,485) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.
***
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1734577)
आगंतुक पटल : 307