अर्थ मंत्रालय
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2021-22 – मालिका -IV
Posted On:
09 JUL 2021 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2021
भारत सरकारची अधिसूचना क्र .4(5)-B(W&M)/2021 दिनांक 12 मे 2021,संदर्भात सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2021-22 – मालिका -IV निपटारा तारीख 20,जुलै, 2021.सह 12-16 जुलै या कालावधीत उघडल्या जातील. आरबीआयने त्यांच्या 9 जुलै , 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात प्रसिद्ध केल्यानुसार या खरेदी कालावधीत रोख्यांची इश्यू किंमत 4,807 रुपये (फक्त चार हजार आठशे सात रुपये) प्रति ग्रॅम असेल.
रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार भारत सरकारने ऑनलाईन अर्ज आणि देय रक्कम डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना निर्गम मूल्यातून (इश्यू प्राईस ) प्रति ग्राम 50 रुपये (फक्त पन्नास रुपये) सूट देण्याचे ठरवले आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांचे मूल्य 4,757 रुपये प्रति ग्रॅम असेल.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734320)
Visitor Counter : 232