उपराष्ट्रपती कार्यालय

कोविड नंतरचे जग आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्याचे उपराष्ट्रपतींचे तज्ञांना आवाहन


कोविड -19 हे मानवतेला सामोरे जावे लागलेले सर्वात गंभीर आव्हान

Posted On: 03 JUL 2021 3:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जुलै 2021

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज कोविड -19 महामारी हे मानवतेला सामोरे जावे लागलेले सर्वात गंभीर आव्हान असल्याचे नमूद केले. त्यांनी भारतीय धोरणकर्ते आणि शैक्षणिक समुदायाला कोविड नंतरचे जग आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

भारतीय वैश्विक परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष (आयसीडब्ल्यूए) असलेल्या उपराष्ट्रपती नायडू यांनी आज हैदराबाद येथून व्हर्चुअल माध्यमातून आयसीडब्ल्यूएच्या प्रशासकीय परिषदेच्या 19 व्या बैठकीला संबोधित करताना हे मत व्यक्त केले. तत्पूर्वी त्यांनी आयसीडब्ल्यूएच्या प्रशासकीय मंडळाच्या 20 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

उपराष्ट्रपतीनी गेल्या वर्षी महामारीच्या काळातही आयसीडब्ल्यूएने केलेल्या उल्लेखनीय कार्यांची प्रशंसा केली. गेल्या सात महिन्यांत, आपल्या संशोधन कार्या व्यतिरिक्त आयसीडब्ल्यूएने एकूण 28 कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्यात परिषद, पॅनेल चर्चा, व्याख्याने, ट्रॅक -2 संवाद आणि पुस्तकांवरील चर्चा यांचा समावेश होता. नायडू यांनी आनंद व्यक्त केला की आपल्या कार्यक्रमात क्षेत्रातल्या अभ्यासावर पारंपारिक लक्ष केंद्रित करण्याव्यतिरिक्त, आयसीडब्ल्यूएने गांधीजी आणि जगसागरी क्षेत्र, सुधारित बहुपक्षीयवादाची प्रगती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि मुत्सद्देगिरी आणि पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांचे योगदान यासारख्या व्यापक विषयांवरही लक्ष केंद्रित करण्यासाठी अलिकडच्या काळात प्रयत्न केले आहेत. त्यांनी नमूद केले की परिषदेने महामारीच्या काळात  डिजिटल मंचाचा पूर्ण वापर केला ज्यामुळे त्याचा विस्तार वाढवण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

उपराष्ट्रपतींनी समाधान व्यक्त  केले की आयसीडब्ल्यूएने परराष्ट्र धोरणाच्या कार्यक्रम सूचित अग्रस्थानी असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचे आणि संवाद, चर्चा आणि संशोधन धोरणात्मक दृष्ट्या अधिक प्रभावी बनवण्याचे  प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

आयसीडब्लूए कार्यक्रमात परराष्ट्र मंत्रालयाचा उच्चस्तरीय सहभाग कायम असून दोघेही समन्वयाने विविध मुद्द्यांवर काम करत आहेत याची नोंद घेत त्यांनी आनंद व्यक्त केला. सागरी व्यवहार, भारत-प्रशांत सागरी उपक्रम, भारतीय सागरी रिम संघटना (आयओआरए)संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे 2021-22 चे अस्थायी सदस्यपद, शांघाय सहकार्य संघटना, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भारत-जपान-रशिया यांचे पूर्वेतील सहकार्य अशा विविध मुद्यांवर दोघे मिळून काम करत आहेत.

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) अभ्यास केंद्र आणि आशिया प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा सहकार्यासाठी परिषदेचे समन्वय केंद्र उभारण्याच्या आयसीडब्लूच्या संबंधित समितीने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. या बहुउद्देशीय परीप्रेक्षात आयसीडब्लूच्या कामासंबंधित माहिती याद्वारे दिली जाईल.

उपराष्ट्रपतींनी यावेळी सप्रू हाऊस:ए स्टोरी ऑफ इन्स्टेट्युशन्स बिल्डिंग इन वर्ल्ड अफेअर्स या पुस्तकाचे प्रकाशनही केले. आयसीडब्लूचे महासंचालक डॉ. टिसीए राघवन आणि आयसीडब्लूतील संशोधक डॉ. विवेक मिश्रा यांनी हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेत सापडलेल्या ऐतिहासिक संदर्भ, नोंदी वर्गवारीनुसार जतन करण्यासाठी आयसीडब्लू संग्रह विभाग उभारण्याच्या संबंधित समितीच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले.

डॉ. टिसीए राघवन यांचा कार्यकाळ 23 जुलै 2021 रोजी संपत असल्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (पूर्व) माजी सचिव डॉ. विजय ठाकूर सिंग यांची आयसीडब्लूचे पुढील महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

परिषदेच्या तीन उपाध्यक्षांनी या आभासी परिषदेत भाग घेतला. यात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालया समबंधित संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष शपीपी चौधरी आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांचा सहभाग होता.

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1732499) Visitor Counter : 293