विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

शहरीकरण, आरोग्य, कृषी आणि पर्यावरण संबंधी आव्हानांवर विज्ञान आणि तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर तोडगा काढू शकतेः डब्ल्यूआयजीएच मध्ये डीएसआयआर सचिवांचे मार्गदर्शन

प्रविष्टि तिथि: 19 JUN 2021 4:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2021


शहरीकरण, आरोग्य, कृषी आणि पर्यावरण संबंधी  आव्हानांवर विज्ञान आणि तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर तोडगा काढू शकते असे डीएसआयआरचे सचिव  आणि  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक प्राध्यापक  शेखर सी. मांडे यांनी सांगितले.

 

"विज्ञान आणि तंत्रज्ञान दूर करू शकेल अशी समकालीन आव्हाने " याविषयावर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था, देहरादून स्थित  वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी येथे  प्रा. एस.पी. नौटियाल स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान  कोणत्याही देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, असे ते म्हणाले.  भारतीय राज्य घटनेत अशा प्रकारची  तरतूद आहे आणि कचरा व्यवस्थापन, ऊर्जा आणि गतिशीलता यासारख्या विविध समस्यांना ते सामोरे जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

 

स्थलांतर रोखण्यासाठी आपल्याला ग्रामीण भागात पेयजल, वैद्यकीय सुविधा, शिक्षण या बाबतीत सन्माननीय जीवनमान उपलब्ध करून द्यावे लागेल आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हे साध्य होऊ शकते, ”असे प्राध्यापक मांडे यांनी डब्ल्यूआयएचजीच्या स्थापना दिन (29 जून 2021)निमित्त  आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत नमूद केले. प्राध्यापक मांडे पुढे म्हणाले की, भविष्यकाळातील महामारीचा  अंदाज वर्तवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विकास आवश्यक असून पर्यावरणावर होणाऱ्या मानवनिर्मित  परिणामांची काळजी घेणे आवश्यक आहे. चक्रीवादळाच्या पूर्वसूचनेच्या फायद्यांच्या उपयुक्ततेची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे आणि म्हणूनच विविध नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला अंदाज वर्तवणाऱ्या प्रणालीकडे  वाटचाल करावी लागेल.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1728541) आगंतुक पटल : 280
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी