संरक्षण मंत्रालय
महाराष्ट्रातील रेवदंडा बंदराजवळ बुडणाऱ्या एमव्ही मंगलम जहाजावरील सर्व 16 कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलाने केली सुटका
Posted On:
17 JUN 2021 9:39PM by PIB Mumbai
भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्रातील रेवदंडा बंदराजवळ बुडणाऱ्या एमव्ही मंगलम या जहाजावरील सर्व 16 कर्मचाऱ्यांची 17 जून 2021 रोजी सुटका केली.
सागरी बचाव समन्वय केंद्र (एमआरसीसी) मुंबईला, भारतीय ध्वजांकित एमव्ही मंगलमकडून माहिती प्राप्त झाली की, रेवदंडा बंदरापासून तीन कि.मी. अंतरावर 16 चालक दल सदस्य असलेले जहाज अंशतः बुडत आहे.
एमआरसीसीच्या पथकाने भारतीय तटरक्षक दलाच्या सुभद्रा कुमारी चौहान जहाजाच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले.दमण येथील भारतीय तटरक्षक दलाच्या एअर स्टेशन वरून तटरक्षक दलाची दोन चेतक हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आली होती वेगवान पावसाळी वाऱ्याचा सामना करत तटरक्षक दलाने गतिमानतेने समन्वय साधून 16 जणांचे प्राण वाचवले
सुटका झालेल्या कर्मचाऱ्यांना रेवदंडा येथे नेण्यात आले आणि त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. जहाजातील सर्व सदस्य सुरक्षित असून त्यांची प्रकृती चांगली आहे.
***
MC/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728068)
Visitor Counter : 223