कोळसा मंत्रालय

कोळशाच्या विक्रीसाठी कोळशाच्या खाणींच्या लिलावाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत हित धारकांची दुसरी सल्लामसलत बैठक


देशातील कोळसा खाणींच्या लिलावाचा सर्वात मोठा टप्पा : सरकार जवळपास 36 अब्ज टनांच्या एकूण स्रोतांसह 67 खाणी लिलावासाठी उपलब्ध करत आहे

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2021 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2021

फिक्कीच्या वतीने आयोजित कोळसा विक्रीसाठी (वाणिज्यिक खाण) कोळसा खाणींचा लिलाव सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात  कोळसा मंत्रालयाने हित धारकांशी चर्चा केली.

कोळसा मंत्रालयाचे  अतिरिक्त सचिव आणि नामनिर्देशित प्राधिकारी  एम. नागराजू , आय.ए.एस.  यांनी आज सांगितले की  व्यावसायिक खाणकामांसाठी कोळसा खाणींच्या लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही जवळपास 36 अब्ज टनांच्या एकूण स्त्रोतांसह 67 खाणी उपलब्ध करत आहोत आणि  एमटीपीएच्या  PRC of ~150 चा शोध घेतला आहे.  देशातील कोळसा खाणींची ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे आणि त्यात 6 कोकिंग कोळसा खाणींचा समावेश आहे. यात 37  पूर्णतः अन्वेषित खाणी आणि 30 अंशतः अन्वेषित कोळशाच्या खाणी आहेत.

सीएमपीडीआयएल आणि डब्ल्यूसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार यांनी बोलीधारकांना माहिती दिली की या टप्प्यात  67  कोळसा खाणी आहेत त्यातील 23 सीएमएसपी खाणी आहेत तर 44 एमएमडीआर खाणी आहेत.

एसबीआय कॅपिटल मार्केटचे  अध्यक्ष आणि व्यवहार सल्लागार शुभम गोयल यांनी लिलाव प्रक्रियेच्या अटी व शर्तींविषयी सादरीकरण केले आणि मंत्रालयाने केलेल्या उदार उपाययोजना अधोरेखित केल्या.

कोळसा मंत्रालय डीडीजी संतोष यांनी राष्ट्रीय कोळसा निर्देशांक आणि या क्षेत्रातील पारदर्शकतेच्या युगात बाजारपेठ आधारित यंत्रणेवर आधारित किंमती आणि पेमेंटमधील बदल यावर सादरीकरण केले.

फिक्कीचे सरचिटणीस दिलीप शेणॉय म्हणाले की, विविध कोळसा खाणींची उपलब्धता वाढवण्याच्या प्रतिबद्धतेच्या दिशेने व्यावसायिक कोळसा खाणींचा दुसऱ्या टप्प्यातील  लिलाव हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1727387) आगंतुक पटल : 112
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Kannada