संरक्षण मंत्रालय
136 वी प्रादेशिक सेना( पर्यावरणीय) आणि तिच्या विविध युनिट्सकडून पुण्यामध्ये व्यापक स्वरुपात वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन प्रकल्पांमध्ये सहभाग
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2021 11:48AM by PIB Mumbai
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये दक्षिण कमांडकडून 136व्या प्रादेशिक सेनेच्या( पर्यावरणीय) माध्यमातून दीड लाख रोपांची लागवड आणि एक लाख बिया (सीडबॉल्स ) खुल्या जागांवर विखरून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे पुण्यातील विविध ठिकाणी 100 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे रुपांतर हरित क्षेत्रांमध्ये होणार आहे.

अशा प्रकारचे उपक्रम पुण्यामध्ये आधीपासून हाती घेण्यात आले असून हे उपक्रम बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप(दिघी), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग( खडकी), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला), सीओडी( देहू रोड) येथे सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत 1.5 लाख रोपांची लागवड, एक लाखांपेक्षा जास्त सीडबॉल्स जमिनीवर विखुरून टाकणे आणि 12.2 लाख लिटर पर्जन्यजलाची साठवण करू शकणाऱ्या 2500 चौरस मीटर आकाराच्या जलाशयाच्या निर्मितीचा समावेश आहे. सध्याच्या मान्सूनच्या हंगामात ही मोहीम चालवली जाणार आहे.

दक्षिण कमांडच्या 11 राज्यांमधील विविध कॅन्टॉन्मेंटमध्ये(छावणी क्षेत्रात) दरवर्षी 2-3 लाख रोपांची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील विविध प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या महत्त्वाच्या वनीकरण मोहिमेमध्ये 136व्या प्रादेशिक सेनेने 200 हेक्टरपेक्षा जास्त जागेत आपले काम सुरू केले असून रोपलागवडीच्या आपल्या सुरुवातीच्या क्षमतेत वाढ केली असून ती 40 हजारवरून 2 लाखांपेक्षा जास्त केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ‘आजादी का अमृत महोत्सव’ सोहळ्याचा एक भाग म्हणून दक्षिण कामांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी “ व्हिजन 75 स्टार” अंतर्गत विविध पर्यावरण संवर्धन उपक्रम सुरू केले आहेत. अशा प्रकारचे पर्यावरण संरक्षण उपक्रम सध्याच्या काळात अतिशय गरजेचे बनले आहेत आणि पर्यावरण रक्षण आणि संवर्धनामध्ये प्रत्येक नागरिकाने सकारात्मक योगदान देणे आणि आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षित आणि चांगल्या भविष्यासाठी प्रयत्नशील राहणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे नैन यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सांगितले.
***
MI/Shailesh P/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1724662)
आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English