आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लसीकरणासंदर्भातील अपप्रचाराला उत्तर


देशभरात लसीकरणाबाबतच्या विविध पैलूंचे व्यवस्थापन करण्यासाठी कोविन एक व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे

निश्चित झालेल्या स्लॉटमध्ये लाभार्थ्यांचे लसीकरण झाले नाही तर जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांचे अयोग्य नियोजन कारणीभूत

लसीच्या उपलब्धतेच्या आधारे लसीकरण स्लॉट प्रसारित करण्याचा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सल्ला

लसीकरणाची वेळ बदलण्याचे वैशिष्ट्य आता कोविनवर उपलब्ध

Posted On: 31 MAY 2021 9:36PM by PIB Mumbai

आरोग्य कर्मचारी  आणि कोविड विरोधातील लढ्यात आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना  प्राधान्य देत भारत सरकार 18 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दिशेने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पाठबळ देत आहे.  देशभरात लसीकरणाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोविन पोर्टल एक व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे.

काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तातून असे सूचित करण्यात आले आहे की, लसीकरण स्लॉटसाठी  कोविन व्यासपीठावर यशस्वीरीत्या नोंदणी करून देखील कोविड-19 प्रतिबंधक लसीची मात्रा मिळण्याची खात्री मिळत नाही. ही वृत्त निराधार आणि असत्य आहेत, या संदर्भात संपूर्ण माहिती नं घेताच प्रसारित केलेली आहेत.

को-विन व्यासपीठ कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण प्रक्रियेदरम्यान नोंदणीची सुविधा (ऑनलाइन आणि लसीकरण स्थळावर  दोन्ही प्रकारे)  लसीकरणाचे नियोजित वेळापत्रक, लसीकरण आणि लाभार्थ्यांना  प्रमाणपत्र प्राप्त करणे सुलभ करते.

को-विन  पोर्टलवर स्लॉटची उपलब्धता जिल्हा लसीकरण अधिकारी (डीआयओ) /लसीकरण केंद्र प्रभारी  यांनी प्रसिद्ध केलेल्या लसीकरण वेळापत्रकांवर आधारित आहे ,जी लसींच्या मात्रांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. लसींच्या मात्रांच्या  उपलब्धतेच्या आधारे लसीकरण स्लॉट प्रसारित करावेत असा सल्ला राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना  देण्यात आला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिल्या आहेत की, लसीकरण केंद्रावर नोंदणी करणाऱ्यांपेक्षा ऑनलाईन नियोजित वेळ दिलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावे

काही प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, जिल्हा लसीकरण अधिकारी लसीकरण सत्र प्रसारित करीत होते आणि नंतर लसीच्या मात्रांचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्यास जिल्हा लसीकरण अधिकारी ते लसीकरण सत्र रद्द करून लाभार्थ्यांना परत पाठवायचे. यामुळे अशाप्रकारची  लसीकरण केंद्रे / सत्रांसाठी नियोजित वेळ दिलेल्या लाभार्थ्यांची गैरसोय झाली. ही समस्या दूर करण्यासाठी, कोव्हिनने आता लसीकरण वेळा बदलण्याचे वैशिष्ट्य उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरुन  जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांना लसीकरण सत्रे रद्द करावी लागणार नाहीत. अशा प्रकरणांमध्ये आता लाभार्थ्यांना  नवीन नियोजित वेळ घ्यावी लागणार नाही.लाभार्थ्याला त्याचे लसीकरण सत्र पुन्हा निश्चित करण्याबाबत माहिती देणारा एसएमएस देखील प्राप्त होईल. ही सुविधा लाभार्थ्यांना लसीकरणाची नियोजित वेळ बदलण्याचा  / रद्द करण्याचा पर्याय देते.

***

MC/Sonal C/DY
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723329) Visitor Counter : 150


Read this release in: English , Hindi , Telugu