संरक्षण मंत्रालय

‘किलर्स’ स्क्वाड्रनच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

Posted On: 29 MAY 2021 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2021

 

भारत पाकिस्तान युद्धादरम्यान कराचीमध्ये डिसेंबर 1971 मध्ये हाहाकार उडवणाऱ्या क्षेपणास्त्रसज्ज बोटींची सध्याची आवृत्ती असलेल्या 22व्या मिसाईल व्हेसल स्क्वाड्रनमधील जहाजांनी 28 मे 2021 रोजी मुंबई बंदरात वार्षिक पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले. आकाराने अतिशय सरळ  आणि वेगवान हालचाली करणाऱ्या या बोटी भारतीय नौदलाच्या सर्वात आधी हल्ला करणाऱ्या आघाडीवरच्या बोटी असून त्यांना किलर्स अशा अतिशय योग्य नावाने ओळखले जाते. त्यांचे केवळ एकमेव उद्दिष्ट असते आणि सर्वप्रथम आणि जोरदार आघात हेच त्यांचे घोषवाक्य आहे. प्रत्यक्षात दरवर्षी 4 डिसेंबरला याच साहसी तुकडीच्या कामगिरीचे स्मरण करण्यासाठी नौदल दिन साजरा केला जातो. नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे ध्वज अधिकारी, प्रमुख कमांडर वाईस ऍडमिरल  आर हरी कुमार यांच्या हस्ते या सोहळ्यात विशेष गुणवत्ताप्राप्त जहाजांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. ही जहाजे महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे प्रमुख ध्वज अधिकारी रेअर ऍडमिरल अतुल आनंद यांच्या अधिकारक्षेत्रात मुंबईत तैनात आहेत.  या ‘ किलर’ तुकडीचा भाग असलेल्या अतुल आनंद यांनी या जहाजांनी आपल्या गौरवशाली इतिहासाचा समृद्ध वारसा असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी नेहमीच आपली कामगिरी उंचावत राहावे आणि शत्रूच्या मनात धडकी भरवण्यासाठी सज्ज राहावे, असे सांगितले.   

 

* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1722800) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu , Hindi