संरक्षण मंत्रालय

ताऊक-ती चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज

Posted On: 15 MAY 2021 5:46PM by PIB Mumbai

 

येत्या काही दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात ताऊक-ती चक्रीवादळामुळे अत्यंत जोरदार ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे, भारतीय हवाई दलाने भारतीय द्वीपकल्पात मदतकार्यासाठी 16 मालवाहू विमाने आणि 18 हेलिकॉप्टर्स जय्यत तयार ठेवली आहेत.

एका आयएल-76 विमानाने 127 कर्मचारी तसेच 11 टन मालाची भटिंडा ते जामनगर अशी वाहतूक केली. आणखी एका सी-130 विमानाने 25 कर्मचारी आणि 12.3 टन सामान भटिंड्याहून राजकोट येथे तर दोन सी-130 विमानांनी 126 कर्मचारी आणि 14 टन सामान भुवनेश्वर येथून जामनगरला पोहोचविले.  

याशिवाय, येत्या काही दिवसांत, वाईट हवामानामुळे नागरी हवाई वाहतुकीवर परिणाम होण्याची चिन्हे दिसत असल्याने किनारपट्टीच्या भागात भारतीय हवाई दलाने कोविड मदत कार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय हवाई दलाने चक्रीवादळामुळे करावे लागणारे मदतकार्याचे केलेले नियोजन, सध्या सुरु असलेल्या कोविड मदत कार्यासह दलाचे अतिरिक्त कार्य असणार आहे.

  

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718830) Visitor Counter : 250


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil