आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविडशी संबंधित कोणत्याही आयात सामग्रीच्या मंजुरीसाठी विलंब होणार नाही : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ

Posted On: 13 MAY 2021 9:02PM by PIB Mumbai

मुंबई, 13 मे 2021

 

देश कोविड-19  विरूद्ध लढा देत असल्याने अत्यावश्यक वस्तूंची  जलद आयात सुलभ करण्यासाठी भारत सरकार सर्व आवश्यक उपाययोजना करीत आहे.

कोविडशी संबंधित कोणत्याही सामग्रीची  खेप आल्यानंतर सीमा शुल्क मंजुरीसाठी विलंब होऊ नये, हे सुनिश्चित केले जात आहे. ऑनलाईन प्रणाली वापरल्या जात आहेत, ज्यामध्ये कोविडशी संबंधित 95% सामग्रीचे मूल्यांकन कोणत्याही अधिकाऱ्याशिवाय केले जाते .जरी सामग्रीची खेप मंजुरीसाठी चेहरा विरहीत मुल्यांकन प्रणालीकडे पाठविली गेली  तरी, नोडल अधिकारी प्रयत्न करून जलद मंजुरी सुनिश्चित करतात. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि  सीमाशुल्क महामंडळाच्या करदाता सेवा महासंचालनालया अंतर्गत असलेल्या मुंबई सीमाशुल्क विभागाने ' कोविड-19 संबंधित आयातीला सीमाशुल्क मंजुरी' या विषयावर आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये, अत्यावश्यक सामग्रीची  आयात गतिमान करण्यासाठी आणि प्रवाहित करण्यासाठी हे आणि इतर धोरणात्मक उपाय या वेबिनारमध्ये व्यापार, उद्योग आणि माध्यमांसमोर  स्पष्ट करण्यात आले. 400 हून अधिक भागधारक या वेबिनारमध्ये सहभागी झाले आणि आयात आणि सीमाशुल्क मंजुरी प्रक्रियेसंदर्भात त्यांच्या शंका दूर करण्यात आल्या.

आयातदार  निर्यातदार सांकेतिक क्रमांकासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ आणि ऑनलाइन केली गेली आहे, तर सीमाशुल्क मंजुरीसाठी असलेल्या इतर कार्यपद्धती सुलभ केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने दिली.

या वेबिनरमध्ये कोविड संबंधित आयात सामग्रीच्या मंजुरीशी संबंधित नवीन सूचना आणि  शुल्कात दिलेली दिलेली सवलत याबद्दल चर्चा करण्यात आली.

तात्पुरता  सवलत आदेश  फक्त तेव्हाच लागू होतो जेव्हा आयातदाराला  विनामूल्य वितरणासाठी  वस्तू विनामूल्य मिळतात. आयातीची इतर प्रकरणे या सवलत  देणाऱ्या आदेशात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.

तात्पुरत्या  सवलतीच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नोडल प्राधिकरण

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळकोविड - 19 संबंधित आपत्कालीन सामग्रीची मंजुरी, प्रक्रिया आणि वितरण सुलभ करत आहे.

https://eccsmobility.cbic.gov.in/eicimobility/import

संरचित स्वरूपातील तपशील शोधून  आणि लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने एक ऑनलाइन तक्रार निवारण अर्ज  तयार करण्यात आहे (URL https://t.co/IAOQenWwO2)

सामान्य प्रश्नांसाठी, वापरकर्ते  icegatehelpdesk@icegate.gov.in  वर ईमेल पाठवू शकतात किंवा टोल फ्री नंबर 1800-3010-1000 वर दूरध्वनी  करून  संपर्क साधू शकतात. मदत कक्षात  प्राप्त झालेल्या विनंत्यांचे  लवकर निराकरण करण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवले जाते.

कोविड-19 संबंधित उपकरणांसंदर्भातील शंका आणि तक्रारी हाताळण्यासाठी विभागाने एक समर्पित मदत कक्ष  देखील तयार केला आहे.देशभरातील नोडल अधिकाऱ्यांची  संपूर्ण यादी येथे उपलब्ध आहे

https://www.cbic.gov.in/resources//htdocs-cbec/NodalOfficers&ClientRelationshipMangaersList_2111.pdf

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718422) Visitor Counter : 107


Read this release in: English , Kannada