वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

एप्रिल 2021 मध्ये भारताची व्यापारी निर्यात 30.21 अब्ज डॉलर्स, एप्रिल 2020 मधील 10.17 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 197.03% नी वाढ आणि एप्रिल 2019 मधील 26.04 अब्ज डॉलर्सपेक्षा 16.03% वाढ

Posted On: 02 MAY 2021 8:51AM by PIB Mumbai

प्रिल 2021 मध्ये भारताची व्यापारी निर्यात 30.21 अब्ज डॉलर्स होती, एप्रिल 2020 मधील 10.17 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 197.03% वाढ तर एप्रिल 2019 मधील 26.04 अब्ज डॉलर्सपेक्षा 16.03% वाढ झाली आहे.

एप्रिल 2021 मध्ये भारताची व्यापारी आयात 45.45 अब्ज डॉलर्स होती, एप्रिल 2020 मधील 17.09 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 165.99% वाढ झाली तर एप्रिल 2019 मधील  42.39 अब्ज डॉलर्सपेक्षा 7.22% वाढ झाली आहे .

एप्रिल 2021 मध्ये 15.24 अब्ज डॉलरची व्यापार तुटीसह  भारत निव्वळ आयातदार  आहे. एप्रिल 2020 मध्ये व्यापार तूट 6.92 अब्ज डॉलर्स होती, त्यात 120.34% वाढ झाली तर एप्रिल  2019 मधील 16.35 अब्ज डॉलर्स व्यापार तुटीच्या तुलनेत 6.81% घट झाली आहे.

एप्रिल 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम निर्यातीचे मूल्य 26.85 अब्ज डॉलर्स होते, जे एप्रिल 2020 मधील 8..3 अब्ज डॉलर्सपेक्षा 200.62 टक्के अधिक आहे. आणि एप्रिल 2019 मधील 22.48 अब्ज डॉलरपेक्षा 19..44% सकारात्मक वृद्धी झाली आहे. एप्रिल 2021 मध्ये बिगर -पेट्रोलियम आणि बिगर-जवाहिरे  निर्यात 23.51 अब्ज डॉलर्स होती. एप्रिल 2020 मधील 8.90 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 164.28 % वाढ झाली तर एप्रिल 2019 मधील 19.61 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 19.89 % सकारात्मक वाढ झाली आहे.

एप्रिल 2021 मध्ये तेलाची आयात 10.8 अब्ज डॉलर्स होती, एप्रिल 2020 मधील 4.65 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 132.26 टक्के सकारात्मक वाढ तर एप्रिल 2019  मधील 11.56 अब्ज डॉलरच्या तुलनेत 6.62 टक्के उणे वाढ झाली.

एप्रिल 2021 मध्ये बिगर-तेल आयात 34.65 अब्ज डॉलर्स एवढी होती, जी एप्रिल 2020 मधील 12.44 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 178.6% अधिक तर एप्रिल 2019 मधील 30.82 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 12.42 टक्के अधिक आहे.

***

S.Thakur/S.Kane/Cyadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715489) Visitor Counter : 208


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi