रेल्वे मंत्रालय

मुंबई महानगर क्षेत्रासाठी पहिली ऑक्सिजन एक्‍सप्रेस कळंबोलीत दाखल

Posted On: 26 APR 2021 2:52PM by PIB Mumbai

मुंबई, 26 एप्रिल 2021

 

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) ने भरलेले  तीन टँकर घेऊन रो-रो सेवा 25 एप्रिल, 2021 रोजी संध्याकाळी 18.03 वाजता गुजरातमधील हापा येथून निघाली आणि 26 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 11.25  वाजता महाराष्ट्रातील कळंबोलीला पोहोचली. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या जलद वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर देण्यात आला होता. रेल्वे मंत्रालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या  ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांद्वारे देशभरातील कोविड-19  रूग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेसने आपल्या गंतव्यस्थानी  पोहोचण्यासाठी 860 किलोमीटरचा प्रवास केला आहे. या टँकरमध्ये अंदाजे  44 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरलेला आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या सुरळीत वाहतुकीसाठी कळंबोली कारशेड येथे आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस हापा येथून विरंगम, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वसई रोड आणि भिवंडी रोड मार्गे सुरक्षेचे सर्व निकष पाळत  कळंबोलीला पोहोचली आहे. जामनगरमधील मेसर्स रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या ऑक्सिजन टँकरचा पुरवठा करण्यात आला आहे.

रेल्वेने आतापर्यंत मुंबई ते विशाखापट्टणम मार्गे नागपूर  ते नाशिक आणि लखनौ ते बोकारो आणि परत अशी  ऑक्सिजन एक्सप्रेस चालविली असून  25.4.2021 पर्यंत सुमारे 150 टन लिक्विड ऑक्सिजन आणला आहे. अशा प्रकारच्या आणखी  ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ देशाच्या विविध भागात चालवणे नियोजित आहे.

 

* * *

Source: PRO, Central Railway

(For more information connect via email to cprocrly[at]gmail[dot]com)

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714101) Visitor Counter : 193


Read this release in: English