आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 च्या दृष्टचक्रातून भारताला मुक्त करण्याचे देशातील निष्णात डॉक्टरांनी दिले पुन्हा आश्वासन



कोविड बरा करण्यासाठी रेडमिसिवीर हेच एक ‘रामबाण’ औषध नाही


“ऑक्सिजन हा औषधाप्रमाणे एक उपचार आहे,”: कोविड रूग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्याच्या अनावश्यक मागणीवर एम्सच्या डॉक्टरांचे मत


अति तीव्र नसलेल्या कोविड बाधित रुग्णांपैकी केवळ 15% रुग्णांची स्थिती गंभीर होते

Posted On: 21 APR 2021 9:12PM by PIB Mumbai

कोविड-19 च्या सध्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणे आणि त्याचा  प्रतिबंध तसेच व्यवस्थापन करण्यासासाठी केंद्र सरकार श्रेणीबद्ध, पूर्व-निश्चय आणि स्वयंप्रेरित दृष्टिकोनातून ‘संपूर्ण सरकार’ पध्दतीअंतर्गत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसोबत बरोबर अनेक पावले उचलत आहे. उच्च स्तरावर यांचे नियमितपणे पुनरावलोकन  आणि   परीक्षण केले जात आहे. डीपीआयआयटीने सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून 30 एप्रिलपर्यंत कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या 12 राज्यांसाठी औषधांच्या पुरवठ्याचे नियोजन जारी केले आहे. राज्यांना ऑक्सिजनचा अखंड पुरवठा सुरु ठेवण्यासाठी केंद्रीय  गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, पीएम-केअर निधीमधून  32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात 162 पीएसए ऑक्सिजन प्लांट्स (154.19 मे.टन क्षमता) ची स्थापना, आयटी अर्जाचे क्रियान्वयन,  वितरण, स्थापना व अंमलबजावणी, दरमहा 27-29 लाख इंजेक्शनच्या  वायल (जानेवारी-फेब्रुवारी) दरमहा अंदाजे 74.10 लाख वायल रेडमिसिवरचे उत्पादन वाढविणे, रेमेडिसवेअर एपीआयच्या निर्यातीवर निर्बंध, औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे या काही उपाययोजना कोविडमुळे बाधित झालेल्यांचा त्रास कमी करण्यासाठी करण्यात आल्या आहेत. 

 

देशभरात दररोज कोविडच्या रुग्ण संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे, परिणामी रेडमिसिवीर सारख्या काही औषधांचा वापर वाढला आहे.  गंभीर लक्षणे असलेल्या कोविड रूग्णांच्या क्लिनिकल व्यवस्थापनामुळे ऑक्सिजनचा  वापर देखील अधिक प्रमाणात होत आहे. अलिकडच्या दिवसांत देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने विविध पावले उचलली आहेत.

 

एम्सचे संचालक, प्रा. (डॉ) रणदीप गुलेरिया,  नारायण हेल्थचे अध्यक्ष डॉ. देवी शेट्टी आणि मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान या देशातील तीन नामांकित डॉक्टरांनी आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय उपचार प्रोटोकॉल अंतर्गत अन्वेषणाधीन उपचार पद्धतीच्या या श्रेणी अंतर्गत रेमडीसिवीरच्या तर्कशुद्ध वापराशी संबधित समस्यांचे निराकरण केले आणि  रुग्णालयांमधील कोविड रूग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा वापर याविषयी मार्गदर्शन केले.

 

 

डॉ. गुलेरिया यांनी कोविड आणि त्याच्याशी संबधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी लस एक महत्वाचे साधन असल्याचे सांगितले : लस आपल्याला संसर्ग होण्यापासून रोखू शकत नाही, परंतु ही लस कोविड स्थिती गंभीर होण्यापासून प्रतिबंधित करते. लसीकरणानंतरही आपल्याला कोविडची लागण होऊ शकते हे समजून घेणे फार महत्वाचे आहे आणि यामुळेच  लसीकरणानंतरही मास्क लावणे आवश्यक आहे.

 

ऑक्सिजन

 

एखादी निरोगी व्यक्ती जिची ऑक्सिजन पातळी 93-94% आहे अशा व्यक्तींना केवळ ही पातळी 98-99% पर्यंत राखण्यासाठी ऑक्सिजनचा उच्च प्रवाह घेण्याची आवश्यकता नाही याबाबत डॉ. गुलेरिया यांनी आश्वस्त केले. ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी असणाऱ्यांना देखील देखरेखीची आवश्यकता  आहे (ऑक्सिजन पर्यायी असल्याने)

 

मधूनमधून ऑक्सिजन घेणे हा ऑक्सिजनचा अपव्यय आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सांगितले की “ऑक्सिजन हा एक उपचार आहे, जे औषधाप्रमाणे काम करते.” यामुळे रोग्याला मदत झाली आहे हे दर्शविणारा कोणताही डेटा उपलब्ध नाही त्यामुळे हा चुकीचा सल्ला आहे.

 

डॉ. त्रेहान यांनी त्यांच्या निरीक्षणा बाबत पुन्हा असे म्हटले आहे की जर आपण योग्य पद्धतीने ऑक्सिजनचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला तर देशात पुरेसा ऑक्सिजनचा साठा  आहे. ऑक्सिजनचा उपयोग ‘सुरक्षित घोंगडी’ म्हणून करू नये अशी त्यांनी लोकांना विनंती केली. ऑक्सिजनच्या अपव्ययामुळे ज्याला याची खरच आवश्यकता आहे अशी व्यक्ती त्यापासून वंचित राहील.

 

ज्या व्यक्तींची ऑक्सिजनची पातळी 94% पेक्षा जास्त आहे त्यांना कोणतीही समस्या नाही असे डॉ. शेट्टी यांनी नमूद केले. जर व्यायामानंतर / जड काम केल्यावर  तुमची ऑक्सिजन पातळी खाली येत असले तर तुम्ही एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या.

 

रेमडिसीवीर

 

सर्व डॉक्टरांनी एकमताने लोकांना रेमडिसीवीरकडे  एक आश्चर्यकारक औषध म्हणून पाहू नयेत अशी विनंती केली. गृह विलगीकारणात किंवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बहुतेक सक्रिय रुग्णांना प्रत्यक्षात कोणत्याही विशिष्ट उपचारांची आवश्यकता नसते. केवळ काही टक्के लोकांना रेमडिसीवीर आवश्यक आहे.

 

एक देश म्हणून आपण एकत्र काम करत ऑक्सिजन आणि रेमडीसिवीरचा योग्य उपयोग केला तर कुठेही कमतरता भासणार नाही असे सर्वानुमते सांगण्यात आले. ऑक्सिजन आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याची आवश्यकता असलेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत अद्यापही संतुलन आहे , असे त्यांनी नमूद केले.

 

प्रत्येक कोरोना बाधित व्यक्तीला रेमडेसीवीर दिले जाणार नाही असा प्रोटोकॉल डॉ. त्रेहान यांच्या रुग्णालयाने केला आहे.  चाचणीचे निकाल, लक्षणे, एखाद्या रुग्णाला असणारे सह-आजार याचा सगळ्याचा विचार केल्यावरच त्याला रेमडेसीवीर दिले जाईल.  रेमडेसीवीर हे काही ‘रामबाण’ औषध नाही.

 

सर्वसाधारण मुद्दे

 

कोविडचे 85 टक्क्यांहून रुग्ण हे रेडमिसिवीर सारखे कोणतेही विशिष्ट उपचार  घेतल्याशिवाय बरे होतात असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. बहुतेकांना सामान्य सर्दी, घसा खवखवणे इ. लक्षणे असतात आणि रोगलक्षणानुसार उपचार घेतल्यानंतर 5--7 दिवसांमध्ये हे रुग्ण बरे होतात.   केवळ 15% रुग्ण या आजाराच्या पुढील टप्प्यात जातात.

 

फार कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासते आणि रुग्णालयातील खाटांचा योग्य वापर केला पाहिजे आणि पुढील सगळी जबाबदारी आपली आहे याचा डॉ. त्रेहान यांनी पुनरुच्चार केला.

 

एखादी व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्या व्यक्तीने डॉक्टरकडे जावे असा सल्ला डॉ. शेट्टी यांनी दिला आहे.  लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केल्यास रुग्ण लवकरात लवकर बरा होतो त्यामुळे घाबरून जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला.

 

एखाद्या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे नसल्याची शक्यता असते अशावेळी डॉक्टर त्या रुग्णाला घरीच रहाण्याचा, स्वत: ला इतरांपासून वेगळे ठेवण्याचा, मास्क लावणे आणि दर 6 तासांनी ऑक्सिजन तपासण्याचा सल्ला देतात. एखाद्या व्यक्तीला अंगदुखी , सर्दी, खोकला, अपचन, उलट्या यासारखी काही लक्षणे असल्यास त्याला तपासणी करण्याचा सल्लाही दिला जातो ज्याच्या आधारे पुढील उपचार केले जातात.

 ***

Jaydevi PS/SM/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713379) Visitor Counter : 271


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu