आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

क्षयरोग लसीबाबतच्या 5 व्या आभासी जागतिक मंचावर डॉ हर्षवर्धन यांचे संबोधन

Posted On: 20 APR 2021 7:40PM by PIB Mumbai

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी क्षयरोग लसीवरच्या 5 व्या आभासी मंचाला दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले. टीबी अर्थात क्षयरोग प्रतिबंधक नवी लस विकसित करून ती वापरात आणण्याबाबत संबंधितांचा जगभरातला हा सर्वात मोठा मंच आहे.

क्षयरोगाविरोधातल्या लढ्यात जागतिक समुदायाने केलेली प्रगती घसरण्याची भीती निर्माण करणाऱ्या अभूतपूर्व अशा जागतिक महामारीतून आपण  सध्या जात आहोत. 2020 या वर्षात कोरोनामुळे सरकारला राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरही लॉकडाऊन आणि इतर प्रतिबंधक उपाययोजना कराव्या लागल्याने कोविड शिवाय इतर सेवांवर झालेला मोठा परिणाम आपण अनुभवला असे डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले. जगभरातल्या राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमालाही याचा फटका बसला. दशकांपासूनच्या प्रगतीवर याचा परिणाम झाला. मात्र आपण असे चालू राहू देता कामा नये. क्षयरोग निवारणासाठीच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही तडजोड होता कामा नये आणि गेली पाच वर्षाची मेहनत या महामारीमुळे वाया जाऊ देता कामा नये.

क्षयरोग  म्हणजे भारतातले एक सर्वात मोठे आरोग्य आव्हान आहे याची जाणीव आपणा सर्वाना असून या क्षयरोगाचा रुग्ण आणि समाजाचे आरोग्य, तसेच मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतात. भारतात अंदाजित 2.64 दशलक्ष क्षयरुग्णांची संख्या पाहता जागतिक स्तर लक्षात घेता ही मोठी रुग्ण संख्या आहे. 2025 पर्यंत क्षयरोग निर्मुलन करण्याच्या दृष्टीने भारताची कामगिरी विशद करतानाच  2020 च्या डिसेंबर अखेरपर्यंत क्षयरोग नोंदीमध्ये भारताने कोविड पूर्व स्थिती गाठली, 1.8 दशलक्ष रुग्णांची नोंद झाली, म्हणजेच एप्रिल 2020 साठी अंदाजित संख्येपेक्षा 11% जास्त. खासगी क्षेत्रानेही 0.5 दशलक्ष रुग्णांची नोंद करत मोठे योगदान दिले. या सर्व एकूण रुग्णांपैकी 95% पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु केल्याचे डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले.  

***

S.Thakur/N.Chitale/C.Yadav

***

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713155) Visitor Counter : 159


Read this release in: English , Hindi , Punjabi