आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सर्व एम्सबरोबर कोविड व्यवस्थापन प्रयत्नांचा आढावा घेतला
Posted On:
20 APR 2021 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या उपस्थितीत कोविड संकटाला सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाबाबत चर्चा करण्यासाठी दहा एम्स, पीजीआयएमईआर चंदीगड आणि जेआयपीएमईआर पुदुच्चेरीच्या संचालकांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली.

कोविड 19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे आणि त्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. हर्ष वर्धन यांनी आतापर्यंत कोविड विरोधातील लढ्याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “कमीत कमी वेळेत आपण चाचण्यांची संख्या एका प्रयोगशाळेवरून आज 2467 प्रयोगशाळांपर्यंत वाढवली असून दररोज 15 लाखांहून अधिक चाचण्याची क्षमता , कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड असलेली कोविड रुग्णालये उभारली आहेत. 12,000 हून अधिक विलगीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली. आपण पीपीई किट्स, एन 95 मास्कची गरज देखील पूर्ण केली. यामुळे गेल्या वर्षी महामारीचा सामना करण्यात मदत झाली. ”

डॉ. हर्ष वर्धन यांनी या संपूर्ण ‘महायज्ञात’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक योगदान अधोरेखित केले. “पंतप्रधान कोविड प्रतिसादाचा सातत्याने आढावा घेत आहेत. ते आघाडीवर राहून नेतृत्व करत आहेत. काल त्यांनी डॉक्टर आणि औषध निर्माण उद्योगाच्या प्रतिनिधींबरोबर सकारात्मक बैठका घेतल्या आणि आज लस उत्पादकांची भेट घेत आहेत. ”

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी विविध संस्थांच्या संचालकांना सूचना दिल्या. त्यांनी एम्सला विनंती केली की, केंद्रीय सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून त्यांनी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713063)
Visitor Counter : 314