माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जागतिक वारसा दिनानिमित्त फिल्म प्रभाग द्वारे ऑनलाईन चित्रपट महोत्सवाचे आयोजन
Posted On:
17 APR 2021 3:21PM by PIB Mumbai
मुंबई, 17 एप्रिल 2021
जागतिक वारसा दिनानिमित्त (18 एप्रिल 2021) फिल्म प्रभागने ऑनलाइन चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. विशेषत्वाने, भारतातील प्रसिद्ध वारसा स्थळे आणि स्मारकांवर आधारित सोळा माहितीपट यात दाखवले जाणार आहेत. फिल्म प्रभागच्या संकेतस्थळ आणि युट्यूब वाहिनीवर 18 आणि 19 एप्रिल 2021 रोजी यांचे प्रसारण होणार आहे.
AVBD.jpg)
दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवात पुढिल चित्रपट दाखवले जातील :
ताज महल (14 मिनिटे / हिन्दी / 1958 / कृष्ण धवल / मुशीर अहमद) - प्रेमाप्रती समर्पित असलेली संगमरवरात कोरलेली ताज महालाची सूंदर वास्तू, कलात्मक प्रतिमांनी यात दृश्यगोचर केली आहे.
फोर सेंच्युरीज अगो (19 मिनिटे /इंग्लीश /1961 /रंगीत /शांती वर्मा) - आग्रा आणि फतेहपूर सिक्री इथल्या वास्तूंमधील स्थापत्यकलेचे सौंदर्य या चित्रपटातून दाखवले आहे.
चोला हेरिटेज (16 मिनिटे / इंग्लीश / 1980/ कृष्ण धवल / अदूर गोपालकृष्णन) - चोला साम्राज्याच्या काळात म्हणजे साधारण 10 व्या आणि 11 व्या शतकातील द्रविड मंदिरे, तांब्यासारख्या धातूची शिल्पे यांचा धांडोळा या माहितीपटात घेतला आहे.
मामल्लापूरम (12 मिनिटे / इंग्लीश /1976 / रंगीत / बी.डी. गर्ग ) - मामल्लापूरम ज्याला महाबलीपुरम देखील म्हटले जाते तिथल्या सातव्या शतकातील पाषाणात कोरलेल्या मंदिरावर आधारीत हा चित्रपट आहे. यात या मंदीराचे कलात्मक आणि अध्यात्मिक मर्म सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
होयसाळा अँड चालुक्यायन आर्किटेक्चर ऑफ कर्नाटका (18 मिनिटे /इंग्लीश/1984/रंगीत/ टी. एस. नागाभरना) - कर्नाटकातील होयसाळा आणि चालुक्य स्थापत्यशैलीच्या विविध पैलूंचा आढावा या चित्रपटात घेतला आहे.
कोनार्क (20 मिनिटे /इंग्लीश /1958 /कृष्ण धवल / हरी एस दासगुप्ता) - कोनार्क मधल्या अज्ञात शिल्पकारांना प्रेरणा देणाऱ्या भव्य स्थापत्य संरचना आणि संकल्पनांवर या चित्रपटात मंथन केले आहे.
कैलाश अॅट एलोरा (18 मिनिटे /इंग्लीश/ 1966 / कृष्ण धवल / क्लिमेंट बॅप्टिस्टा) - एलोरा अर्थात वेरुळ इथल्या लेण्यांमध्ये कोरलेल्या कैलास मंदिराची माहिती यात दिली आहे.
खजूराहो (18 मिनिटे /इंग्लीश /1956 /कृष्ण धवल /मोहन एन वाधवानी) - देवतांची नगरी खजूराहो यात दाखवली आहे. हिंदू संस्कृतीच्या पुनरुज्जीवन काळात, मंदिर स्थापत्य कलेला उत्तेजन मिळाले आणि त्याची सर्वात विलक्षण अभिव्यक्ती खजुराहो येथील मंदिरांच्या प्रेरणादायक समूहांमध्ये दिसते.
केव टेम्पल्स इन इंडिया (10 मिनिटे / इंग्लीश / 1951 / कृष्ण धवल / जगत मुरारी) - बदामी, घारापूरी(एलिफंटा) आणि वेरुळ इथल्या पाषाणात कोरलेल्या लेण्यांची माहिती यात दिली आहे. या अनुषंगाने संबंधित कालखंडातील भारतीय इतिहासाचे, धार्मिक परंपरांचे विविधांगी चित्रण अप्रतिम स्थापत्य कलेच्या पार्श्वभूमीवर यात केले आहे.
मांडू – द सिटी ऑफ जॉय (11 मिनिटे इंग्लीश/1957 कृष्ण धवल/नील गोखले ) - सहाशे वर्षांपूर्वी महान साम्राज्य असणाऱ्या माळवा या प्रदेशाची सफर या चित्रपट प्रेक्षकांना घडवून आणतो.
नागार्जुनाकोंडा (16 मिनिटे / इंग्लीश / 1958 / कृष्ण धवल / एस.एन.एस. सास्त्री) - आंध्र प्रदेशाती कृष्णा नदीच्या तीरावर दोन हजार वर्षापूर्वी वसलेल्या नागार्जुनकोंडाची कहाणी यात सांगितली आहे. प्राचीन कलेचे केन्द्र असणाऱ्या या नगराची विहंगम सैर यात घडवली आहे.
इम्मॉर्टल स्तुपा (12 मिनिटे/ इंग्लीश/1961 /कृष्ण धवल /प्रेमनाथ तरवाज)- मध्य प्रदेशातील भोपाळ जवळ असलेल्या सांची इथल्या महान स्तुपावर आधारित हा चित्रपट आहे. सुमारे अडीच हजार वर्ष मागे नेत, सम्राट अशोक यांचेही स्मरण केले आहे.
हिल टेम्पल्स ऑफ गुजरात; (13 मिनिटे / इंग्लीश / 1964 / कृष्ण धवल / बिरेन दास) - गुजरातमधल्या पालिताना, गिरनार, तरंगा टेकडी आणि पावागडचा हा चित्रणप्रवास आहे.
ओरछा का वैभव (52 मिनिटे / हिन्दी / 2011 / रंगीत / देवेन्द्र चोप्रा) - ओरछा आणि बुंदेलखंड इथल्या पुरातन स्मारकांचा धांडोळा यात घेतला आहे. यात काही विलक्षण कलात्मक आणि बेहद्द सुंदर स्थळे आणि विलोभनीय मंदिरांचा समावेश आहे.
आर्कीऑलॉजी अँड मॉन्यूमेंट्स ऑफ त्रिपूरा (53 मिनिटे / इंग्लीश / 2012 /रंगीत / शामल घोष) - त्रिपूरातल्या बहुतांश पुरातन स्थळे आणि स्मारकांचा आढावा या चित्रपटात घेतला आहे.
हम्पी (26 मिनिटे / इंग्लीश / 2012 / रंगीत / अजय बन्सल) - विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हम्पी आणि त्यातील स्मारकांवर आधारित हा चित्रपट आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने हम्पीची नोंद केली आहे.
7Q15.jpg)
हे माहितीपट www.filmsdivision.org/Documentary of the Week आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision इथे 18th ते 19 एप्रिल, 2021रोजी दाखवले जातील. सर्व चित्रपटांचे दोन्ही दिवशी थेट प्रसारण केले जाईल.
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712412)
Visitor Counter : 236