विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत कोवॅक्सिन निर्मितीसाठी उत्पादन क्षमतेचा विस्तार

Posted On: 16 APR 2021 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2021

आत्मनिभार भारत 3.0 अभियानांतर्गत, स्वदेशी कोविड लसींचा विकास आणि उत्पादन वृद्धिंगत करण्यासाठी भारत सरकारकडून कोविड सुरक्षा जाहीर करण्यात आली. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) विभागाच्या  वतीने ही योजना राबविली जात आहे. 

या अभियानांतर्गत केंद्र सरकारचे जैवतंत्रज्ञान विभाग वाढीव उत्पादन क्षमतांसाठी लस निर्मितीच्या सुविधांना अनुदान म्हणून आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे. स्वदेशी विकसित कोव्हॅक्सिन लसची सध्याची उत्पादन क्षमता मे-जून 2021 पर्यंत दुप्पट होईल आणि त्यानंतर जुलै - ऑगस्ट 2021 पर्यंत ते 6 ते 7 पट वाढेल म्हणजेच एप्रिल, 2021 मधील 1 कोटी लसींचे उत्पादन जुलै-ऑगस्ट महिन्यात वाढून मासिक 6 ते 7 कोटींपर्यंत जाईल. सप्टेंबर 2021 पर्यंत दरमहा सुमारे 10 कोटी मात्रांचे उत्पादन अपेक्षित आहे.

लसींची उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल याचा आढावा घेण्यासाठी काही आठवड्यांपूर्वी आंतर-मंत्रालयीन पथकांनी भारतातील दोन मुख्य लस उत्पादक संस्थाना  भेट दिली होती.  या काळात लस उत्पादकांसोबत या योजनेसंदर्भात विस्तुत चर्चा करण्यात आली.

या विस्तार योजनेचा भाग म्हणून, भारत बायोटेक लिमिटेड, हैदराबाद तसेच सार्वजनिक क्षेत्रातील इतर उत्पादक संस्थाच्या आवश्यक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानामध्ये सुधारणा केल्या जात  आहेत. भारत बायोटेकच्या बंगळुरू येथील नवीन लस उत्पादक केंद्राला भारत सरकारकडून 65 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पुरवले जात आहे.

लसी उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील 3 कंपन्यांनादेखील सहाय्य दिले  जात आहे.

  • हाफकीन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई - महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत कार्यरत राज्य सार्वजनिक उपक्रम. या संस्थेला लसीच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून  65 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. हाफकीन बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडने हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 12 महिन्यांचा कालावधी मागितला होता. तथापि, केंद्र सरकारने त्यांना तातडीने 6 महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. एकदा लसीचे उत्पादन सुरु झाल्यावर येथे दरमहा 20 दशलक्ष डोसचे उत्पादन होईल.
  • इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड (आयआयएल), हैदराबाद - राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळ  आणि केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत, भारत इम्युनोलॉजिकल अँड बायोलॉजिकल लिमिटेड (बीआयबीसीओएल), बुलंदशहर, यांच्या अंतर्गत कार्यरत सुविधा केंद्राला देखील ऑगस्ट - सप्टेंबर 2021 पर्यंत दरमहा 10-15 दशलक्ष डोस ट्यूब पुरवण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक सहाय्य प्रदान करेल.

 

 

Jaydevi PS/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1712344) Visitor Counter : 220


Read this release in: Urdu , Hindi , Telugu