आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड 19 लसीकरण- 90 वा दिवस
रात्री 8 वाजेपर्यंत 26.02 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या, देशभरात एकूण 11.70 कोटींहून अधिक लसींच्या मात्र देण्यात आल्या आहेत
Posted On:
15 APR 2021 10:01PM by PIB Mumbai
देशभरात आज रात्री 8 वाजेपर्यंत लसीच्या 26.02 लाखांपेक्षा अधिक मात्र देण्यात आल्यामुळे आज लसीकरणाने 11.70 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज 67,400 कोविड लसीकरण केंद्रे कार्यरत होती, सरासरी 22,400 कार्यान्वित लसीकरण केंद्रांची वाढ नोंदविण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणची कोविड लसीकरण केंद्रांमुळे लाभार्थींच्या संख्येत मोठी भर पडली.
आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार लसींच्या एकूण 11,70,96,037 मात्रा देण्यात आल्या.
या आकडेवारीमध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 90,82,153 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या 56,33,982 आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 1,02,90,850 कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 51,51,557 कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,86,76,098 लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या 45 ते 59 वर्षे वयोगटातील 9,84,785 लाभार्थ्यांचा तसेच पहिली मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 4,41,90,147 लाभार्थ्यांचा, दुसरी मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 30,86,465 लाभार्थ्यांचा समावेश आहे.
कोविड-19 लसीकरणाच्या 90 व्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत लसीच्या एकूण 26,02,375 मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालानुसार यामध्ये 20,59,873 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 5,42,502 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल आज रात्री उशिरा पूर्ण होईल.
***
S.Thakur/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712141)