उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींचे जनतेला कोविड प्रतिबंधक वर्तनाचा अंगिकार करण्याचे आवाहन


महामारीच्या उच्चाटनासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा आणि संघभावनेने एकत्रितपणे कार्य करा- उपराष्ट्रपतींची राज्यांना सूचना

Posted On: 14 APR 2021 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2021 

 

उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक वर्तनाला प्रोत्साहित करून त्यांचा अंगिकार करण्याचे आवाहन केले. जेणेकरून या महामारीलार आळा घालण्यास मदत होईल. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ‘टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट’ ही सिद्ध झालेली आणि विश्वासार्ह असलेली त्रिसूत्री राबवण्याचेही त्यांनी आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हर्चुअल माध्यमातून  सर्व राज्यांच्या राज्यपालांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी समाजाच्या सहकार्याने विषाणूचा फैलाव नियंत्रित केला जाऊ शकतो यावर भर दिला आणि जनतेने या महत्त्वपूर्ण बाबीकडे सतत लक्ष देण्याचे आवाहन केले.

देशातील कोविड-19 च्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीबाबत चिंता व्यक्त करताना नायडू म्हणाले की यामुळे देशातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडत आहे. मागील 14 दिवसांत राष्ट्रीय रुग्णसंख्येत 85 टक्के आणि 89 टक्के मृत्यू झालेल्या 10 राज्यांकडे विशेष लक्ष देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.

हे आव्हान खूपच चिंताजनक आहे हे ओळखून उपराष्ट्रपती म्हणाले की, मागील वर्षाच्या तुलनेत आज आम्ही याचा सामना करण्यासाठी योग्य प्रकारे सज्ज आहोत कारण देशाने मागील एक वर्षाच्या कालावधीत पायाभूत सुविधांची अनेक कामे केली आहेत. “आता आपल्याकडे सुरक्षित आणि प्रभावी लसी आहेत,” असे ते म्हणाले.

प्रत्येक राज्यपाल हा त्या राज्याचा घटनात्मक प्रमुख असल्याने या महामारी विरुद्धच्या लढाईत प्रत्येक राज्यपालांची भूमिका ही महत्वपूर्ण असल्याचे नमूद करत नायडू यांनी राज्यपालांना संबधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सक्रियपणे सहकार्य करण्यास सांगितले. “आपण केवळ आपला अनुभव आणि कौशल्याच  सामायिक करू नका तर राज्य सरकारांना अधिक प्रभावी रणनीती तयार करण्यासाठी मार्गदर्शन देखील करू शकता,” असे त्यांनी राज्यपालांना सांगितले.

राज्यपाल हे परिवर्तनाचे संभाव्य घटक म्हणून काम करू शकतात आणि या साथीच्या रोगाविरूद्धच्या  लढाईत अधिकाधिक लोकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करून मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना पाठबळ प्रदान करू शकतात, असे सांगून नायडू यांनी राज्यपालांना राज्य सरकारांसोबत काम करण्यास  आणि याला लोकचळवळ बनविण्यास सांगितले.

केंद्र सरकारने कोविड-19 संबधित धोरण हे राज्य सरकारांच्या सहकार्याने ठरविल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आणि प्रत्येकाने राजकीय मतभेद बाजूला ठेवून संघभावनेने एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

प्रसार माध्यमांच्या भूमिकेचे कौतुक करताना नायडू यांनी कोविड योग्य वर्तनाविषयी विशेषत: योग्य मास्क घालण्याच्या महत्वाबद्दल  अधिकाधिक जनजागृती करण्याचे आवाहन केले.

उपराष्ट्रपतींनी तरूणांना प्रथिनयुक्त आहार घेण्याचा आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला.

उपराष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा.
 

 

* * *

S.Patil/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711897) Visitor Counter : 125


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi