वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत हा युरोपियन युनियनचा नैसर्गिक भागीदार म्हणून सिद्ध होऊ शकतो - पीयूष गोयल

प्रविष्टि तिथि: 13 APR 2021 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021

 

भारत हा युरोपियन युनियनचा सर्वाधिक योग्य नैसर्गिक भागीदार सिद्ध होईल असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज केले. युरोपियन युनियन आणि भारत हे उत्तम प्रशासन, वाढ आणि विकास यांचे प्रतीक म्हणून बहरतील असे ते म्हणाले.

भारत आणि युरोपियन युनियन यांची विविधतेमधील एकात्मता म्हणजे लोकशाही आणि कायद्याचे राज्य ही मुल्ये समान आहेत त्याशिवाय बळकट आर्थिक सामाजिक सांस्कृतिक धोरणात्मक आणि राजकीय बंध त्यांच्यामध्ये आहेत. भारत आणि युरोपियन युनियन या जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठा आहेत. युरोपियन युनियनमधचा घटक असलेली राष्ट्रे ही एकत्रितपणे भारताची सर्वात मोठी व्यापार भागीदार राष्ट्रे आहेत. त्याशिवाय ही राष्ट्रे भारतातील सर्वात अधिक गुंतवणूकदार सुद्धा आहेत. भारत व युरोपियन युनियन यांच्यामधील आयात-निर्यात ही समतोल आणि परस्पर पूरक आहे. भारत-युरोपियन युनियन भागीदारी ही संशोधन आणि नवोन्मेष स्तरावर लक्षणीयरीत्या विस्तारित केली जाऊ शकते आणि त्याला भरपूर वाव आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड-19 बद्दल बोलताना गोयल म्हणाले की, वर्ष 2020 ने जगाचा निश्चय आणि निग्रह यांची परीक्षा घेतली. भारताने सर्वात कडक टाळेबंदी लावली, कारण जीवन मौल्यवान आहे, यावर आमचा सर्वात जास्त विश्वास आहे. लॉकडाऊन मध्ये आम्ही तयारी करू शकलो.  जीव रक्षक प्रणाली, आयसीयू बेड, पीपीई कीट यांसारख्या मूलभूत गोष्टींची तयारी करता आली.  लॉकडाऊन असतानाही आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचे पालन केले. खास करून सेवा क्षेत्रात वचनबद्धतेचे पालन करत आम्ही कुठल्याही मूल्य-साखळी वर परिणाम होऊ दिला नाही. अन्नधान्य, भाजीपाला, दूध, औषधे यासारख्या जीवनावश्यक गोष्टी  घरोघरी पोहोचतील याची व्यवस्था केली असे त्यांनी सांगितले.

जागतिक व्यापार संघटनेच्या सुधारणा या भारत आणि युरोपियन युनियन या दोघांचेही लक्ष्य आहे. युरोपियन भागीदाराबरोबर काम करून यावर्षी मे महिन्यात पोर्तो येथे होणाऱ्या भारत-युरिपयन युनियन परिषदेबाबत उत्सुक असल्याचे गोयल म्हणाले.

S .Thakur /V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1711608) आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी