रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय महामार्गातील महत्वपूर्ण कामगिरी

Posted On: 01 APR 2021 5:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत देशभरात राष्ट्रीय महामार्गांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. प्रमुख कामगिरीविषयी संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे:

  • गेल्या 7 वर्षात राष्ट्रीय महामार्गाची लांबी 50% वाढून 91,287 किमी (एप्रिल 2014 मधील) पासून 1,37,625 किमी (20 मार्च 2021 रोजी) पर्यंत गेली आहे.
  • अर्थसंकल्पीय नियतव्यय आर्थिक वर्ष 2015 मधील, 33,414 कोटी रुपयांवरून 5.5 पट वाढून आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1,83,101 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • कोविड -19 संबंधित परिणाम असूनही आर्थिक वर्ष 2020 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021 मध्ये मंजूर रक्कम 126% वाढली आहे. आर्थिक वर्ष 2020 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021 मध्ये किलोमीटरच्या मंजूर लांबीमध्येही 9% वाढ झाली आहे;
  • आर्थिक वर्ष 2010 ते आर्थिक वर्ष 2014 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2015 ते आर्थिक वर्ष  2021 या कालावधीत सरासरी वार्षिक प्रकल्पात (वार्षिक सरासरी लांबी) 85% वाढ झाली आहे.
  • आर्थिक वर्ष 2010 ते आर्थिक वर्ष 2014 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2015 ते आर्थिक वर्ष  2021 या कालावधीत सरासरी वार्षिक बांधकामात (सरासरी वार्षिक बांधकाम लांबी) 83% वाढ झाली आहे.
  • आर्थिक वर्ष 2020 (मार्च 31 पर्यंत) च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021 च्या अखेरीस चालू असलेल्या प्रकल्पांच्या कामकाजाच्या किंमतीत 54% वाढ झाली आहे.

ही कामगिरी जगात एकमेवाद्वितीय असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709080) Visitor Counter : 212


Read this release in: Hindi