कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
एनपीएस अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने जारी केली अधिसूचना
Posted On:
31 MAR 2021 7:54PM by PIB Mumbai
एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भातल्या बाबींचे नियमन करण्यासाठी, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
अर्थविषयक व्यवहार मंत्रालयाच्या 22 डिसेंबर 2003 च्या अधिसूचनेनुसार नवी योगदान आधारित पेन्शन योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर एनपीएस अंतर्गत नोंदणी,योगदान,गुंतवणूक,निधी व्यवस्थापन,रक्कम काढणे, वर्षासन इत्यादी बाबींचे नियमन पीएफआरडीए कायदा 2013 नुसार करण्यात येत आहे.
मात्र एनपीएस कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक सेवाविषयक बाबी या कायद्यामध्ये समाविष्ट नव्हत्या. म्हणूनच एनपीएसची अंमलबजावणी सुटसुटीत करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने, एनपीएस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सेवा नियम आखण्याच्या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला.
एन पी एस कर्मचाऱ्यांना उपलब्ध विविध लाभ आणि सुविधा घेण्यासाठीच्या प्रक्रियेबाबत तपशीलवार मार्गदर्शक सूचना या अधिसूचनेत आहेत.नोंदणी करण्यासाठी, एनपीएस खात्यात योगदान क्रेडीट अर्थात जमा करण्यास विलंब झाल्यास सरकारी कर्मचाऱ्याला देण्यात येणारी भरपाई, सेवा काळात सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास सीसीएस (निवृत्तिवेतन) नियम किंवा एनपीएस नियमाअंतर्गत लाभासाठीचे विकल्प, निवृत्तीच्या वेळी देय लाभ, मुदतपूर्व निवृत्ती,स्वेच्छा निवृत्ती, स्वायत्त संस्था किंवा सार्वजनिक उपक्रमात समावेश या संदर्भातल्या तपशीलवार सूचनांचा यात समावेश आहे.
याआधी सेवा काळात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कौटुंबिक पेन्शन, अपंगत्व पेन्शन, असाधारण कौटुंबिक पेन्शन हे लाभ, 01.01.2004 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याप्रमाणेच, एनपीएस धारक सरकारी कर्मचाऱ्यांनाही 05.05.2009 च्या आदेशाद्वारे लागू करण्यात आले.
****
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708779)
Visitor Counter : 361