जलशक्ती मंत्रालय
केंद्रीय जल शक्ती मंत्र्यांद्वारे जल जीवन अभियानांतर्गत 7 राज्यांसाठी कामगिरी प्रोत्साहन निधी म्हणून 465 कोटी रुपये मंजूर
Posted On:
27 MAR 2021 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2021
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात सन 2024 पर्यंत नळाद्वारे खात्रीशीर पाणीपुरवठा करण्यासाठी अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, सिक्कीम, गुजरात आणि हिमाचल प्रदेश ही सात राज्ये जल जीवन अभियान- हर घर जल अंतर्गत कामगिरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरली आहेत. जल जीवन अभियानांतर्गत कामगिरी प्रोत्साहन अनुदानासाठी निकषांमध्ये प्रत्यक्ष आणि आर्थिक प्रगती, नळाद्वारे पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि निधी वापरण्याची क्षमता यांचा समावेश आहे. आज केंद्रीय जल शक्ती मंत्री, गजेंद्रसिंग शेखावत यांनी या राज्यांना कामगिरी प्रोत्साहन निधी म्हणून 465 कोटी रुपये मंजूर केले.
15 ऑगस्ट, 2019 रोजी जल जीवन अभियान जाहीर केल्यापासून आतापर्यंत चार कोटी कुटुंबांना पाण्याची नळ जोडणी देण्यात आली आहे, ज्यायोगे देशातील ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात 3.23 कोटी (17%) वरून 7.20 कोटी (37.6%) पर्यंत वाढ झाली आहे.
प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जल जीवन अभियान राबविण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यात गुजरातचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, जल जीवन अभियानासाठी (जेजेएम) 11,000 कोटी रुपयांचे वाटप केले गेले.
* * *
S.Tupe/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708101)
Visitor Counter : 305